ताज्या घडामोडी

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारा पडण्याची शक्यता*

वृतांकन संपादक शातांरामभाऊ दुनबळे पोलीस टाईम्स न्युज

*कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारा पडण्याची शक्यता*

*हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून १५ते १८ फेब्रुवारीदरम्यान पावसासह गारा पडण्याची शक्यता*

मुंबई : हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारा पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. १६ फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तीनही विभागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

१८फेब्रुवारीलाही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल. कोकण विभागात १७आणि १८ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. पावसाच्या कालावधीत रात्रीच्या किमान तापमानात आणखी वाढीची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या या अंदाजानंतर शेतकऱ्यांच्या चिंता आणखी वाढणार आहेत. पाऊस पडल्यास यामुळे पीकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close