ताज्या घडामोडीदेशविदेशमहाराष्ट्रसंपादकीय

न्यायमूर्ती पी. बी. सावंत साहेब म्हणजे सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारे महामानव..!* पोलीस टाईम्स न्युज परिवार वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 🌹💐🌹💐 .. वृतांकन संपादक शातांरामभाऊ दुनबळे

 

*न्यायमूर्ती पी. बी. सावंत साहेब म्हणजे सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारे महामानव..!*
पोलीस टाईम्स न्युज परिवार वतीने भावपुर्ण श्रद्धांजली 🌹💐🌹💐 .. वृतांकन संपादक शातांरामभाऊ दुनबळे
शिवकालीन इतिहासाबाबतचा लेखक प्र.के. अत्रे आणि इतिहासाचार्य प्रा. मा. म. देशमुख यांच्यातील वाद प्रसिद्ध आहे. ब्राम्हण्यवादी शक्तींनी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात नेले असता मा. न्या. पी.बी.सावंत साहेब तेव्हा उच्च न्यायालयात वकील होते तेव्हा त्यांनी विनामूल्य ही केस लढली आणि यात ब्राम्हणवादी छावणी पराभूत झाली.
*रामदास छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाही हे मुंबई हायकोर्टाने निकाल देताना १९६८ लाच स्पष्ट केले.* पी.बी.सावंत साहेबांचा अभ्यास आणि कष्ट तर मा.म. देशमुख यांची ही जिद्द यामुळे ही केस जिंकली. ब्राम्हण्यवादी शक्ती पराभूत झाली. रामदास स्वामी संदर्भात लिखाण केले म्हणून अत्रेंनी देशमुखांची *”प्रेतयात्रा”* काढली होती. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मा.म. देशमुख यांची शिवप्रेमींनी *”भव्य प्रेमयात्रा”* काढली होती. या घटना १९६८ च्या काळात घडल्या. *रामदास स्वामींचा आणि शिवरायांचा काहीच संबंध नाही हे १९६८ च्या निकालाने स्पष्ट झाले.* पुढे सावंत साहेब सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले, आंतरराष्ट्रीय प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष बनले तर रामदासी -आरएसएस वृत्तीची विकृती या घटनेमुळे पुढे आली…
*वैचारिक परिवर्तनवादी व पुरोगामी विचारांचा बाप माणूस.*
राजमाता जिजाऊ शहाजीराजे आणि छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ पुणे महानगरपालिकेवर दहा हजार लोकांचा मोर्चा काढून दादू कोंडदेव चा पुतळा काढलाच पाहिजे यासाठी अभ्यासपूर्ण विश्लेषण करणारे न्यायमूर्ती पी.बी. सावंत साहेब होय..
*मराठा आरक्षणाला ओबीसी शिवाय पर्याय नाही, असे ठाम मत मांडणारे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत सर होय..*
ज्या न्यायव्यवस्थेत न्यायाधीशाच्या मृत्युलाही न्याय मिळणेही असते दुरापास्त अन् न्यायाचा “निकाल” लावत सर्वोच्च न्यायासनही स्वत:ला करुन घेतो स्वत:कडुनच स्वच्छ. निवृत्तीनंतर सत्तेकडुन सत्तेकडे जाण्याच्या राजमार्गावर अंथरते पायघड्या. “निकाला”च्या अश्या न्यायालयीन मिट्ट अंध:कारात अन्यायग्रस्तांना न्यायाचा प्रकाश कवडसा देणारा सामाजिक जाणीवा-बांधीलक्यांचा मिणमिणता दिवा विझला…
बहुजनवादी मराठा चळवळीचा आधारस्तंभ, न्यायपालिकेतील न्यायिक चरित्र जपणारं तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व, वैचारिक आणि न्यायिक मुद्द्यांवर आतापर्यंत साहेबांची भुमिका अत्यंत अग्रणी राहिलेली आहे. न्यायिक मुद्द्यांवर मार्गदर्शन करणारा एक सच्चा व निर्भिड व्यक्तिमत्वास आज आम्ही मुकलो आहोत .
असो, जो जन्माला आला आहे त्याला जावेच लागणार आहे, हा निसर्गनियम आहे, असे असले तरी
*”मरावे परि किर्ती रुपी उरावे”* ह्या म्हणीनुसार स्मृतीशेष सावंत साहेबांचे नितीमान व चारित्र्यसंपन्न विचारांची शिदोरी प्रत्येक बहुजनवादी मराठा कार्यकर्त्याजवळ निरंतर राहणार आहे आणि आम्हांला ती जपावी लागणार आहे. हीच त्यांच्यासाठी खरी शिवांजली ठरेल…।
संविधानाचा खरा खुरा रक्षक गेला…
शोषित-पीडित जनतेचा आधार गेला..

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

स्मृतीशेष न्या. पी.बी. सावंत साहेब तुम्हांला भावपुर्ण आदरांजली…🙏🏻💐

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close