ताज्या घडामोडी

थकीत वीज बिल वसुलीसाठी ग्रामपंचयतीने सहभाग घ्यावा. ……उपअभियंता पाटील

थकीत वीज बिल वसुलीसाठी ग्रामपंचयतीने सहभाग घ्यावा. ……उपअभियंता पाटील

प्रतिनिधी ___एजाज देशमुख

आज तारीख १६ फेब्रवारी रोजी पहिल्याच दिवशी पाटोदा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झालेले प्रताप पाचपुते व उपसरपंच रईसभाई देशमुख तसेच नवनिर्वचित सदयस यांची येवला विभाग महावितरण उपकार्यकारी अभियंता श्री पाटील साहेब तसेच पाटोदा विभाचे अभियंता श्री चौधरी साहेब व त्यांचे सहकारी यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर शेतकऱ्यांना फायदेशिर ठरणाऱ्या अनेक शासनाच्या योजनांची महिती दिली त्यात मुख्यतः थकीत वीज बिलांची ग्रामपंचयतीमार्फत वसुली केल्यास शासनास जमा होणाऱ्या रकमेतून ३३% रक्कम ही ग्रामपंचायत मार्फत विकास कामांना वापरण्यास शासन देणार आहे तेव्हा ग्रामपंचायतने महावितरण व शेतकरी यांचेत समन्वय साधून वीज बिल वसुली साठी महावितरणला सहकार्य करावे असे श्री पाटील साहेब यांनी आव्हान केले यावेळी सौरऊर्जा पंप या योजनेचे श्री चौधरी साहेब यांनी फायदे जनतेला समजाऊन सांगितले जास्तीजास्त लोकांनी सदर च्या योजनेचा लाभ घ्यावा व या संधर्भात कोणती ही शंका अथवा अधिक माहिती साठी पाटोदा येथील महावितरण कार्य लयात येऊन भेटावे.
असे आव्हान केले
या प्रसंगी श्री पाटील साहेब हे प्रथमच पाटोदा ग्रामपंचायतीत आले म्हणून ग्रामपचायतीमार्फत सरपंच प्रताप पाचपुते उपसरपंच रैसभाई देशमुख सर्व सदस्य ज्येष्ठ नेते साहेबराव आहेर आयुब भाई पठाण मारुती पाटील घोरपडे तंटा मुक्ती अध्यक्ष श्री प्रभाकर बोरनारे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व महावितरण कडून शेकऱ्यान साठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close