ताज्या घडामोडी

ट्रस्टच्या विद्यार्थीना रोटरी क्लबच्या माध्यमातून ई-लर्निग डिजिटल कीटचे वाटप

ट्रस्टच्या विद्यार्थीना रोटरी क्लबच्या माध्यमातून ई-लर्निग डिजिटल कीटचे वाटप

कर्जत : विजय डेरवणकर

कोरोनाच्या महामारीने जगाला हादरवले. त्याचे गंभीर परिणाम आज हि दिसून येत आहेत. कोरोनाने जगातील आर्थिक सत्ता पूर्णतः कोलमडली आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणार्या भारत देशातील परिस्थिती फारशी वेगळी नाही. भारतातील ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्याच्या तुलनेने कमी पडू लागले आहेत. या नवीन ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये टिकून राहण्यासाठी आणि डिजिटल पद्धतीचा वापर करण्यासाठी. लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यामातून आणि रोटरी क्लब च्या सहकार्यातून ट्रस्टच्या विद्यार्थी आणि शिक्षकासाठी ई-लर्निग डिजिटल कीटचे वाटप नुकतेच करण्यात आले.
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट गेल्या 15 वर्षा पासून कर्जत तालुक्यात अनाथ, एकल पालकत्व, गरीब, गरजू विध्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाकरीता कार्य करीत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर, वकील, इंजीनिरिग, शिक्षक, आय.एस.आय. अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य करीत आहे. त्याकरिता या विद्यार्थ्याना मार्गदर्शन तसेच शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे महत्वाचे काम गेल्या 15 वर्षापासून करीत आहे. त्याच एक भाग म्हणून 8 वी ते 10 वी च्या विध्यार्थ्याना डिजिटल कार्य प्रणालीचा वापर करून ऑडीओ, व्हिडीओ च्या माध्यमातून त्यांची प्रगती होण्याकरिता त्यांना ई-लर्निग कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, तिवरे येथील जीवन आशा कम्युनिटी सभागृहात करण्यात आले होते.
या प्रसंगी ट्रस्टच्या संचालिका विली डॉक्टर, रमेश दासवानी (सी.ई.ओ.), कमाल दमानिया (सी.ओ.ओ.), शिला अय्यर (मार्केटिंग प्रमुख), सुधीरकुमार गजभिये (एच.ओ.ई.) तर रोटरी क्लबचे योगेश झवेरी, प्रफुल शर्मा, सुनील मेहरा, एच.पी.सिग्ला, विरेन गोहिल, अमिता लोढया. आणि यु.एस.ए. वरून ऑनलाईन मेरी बेट्स, मेरी लाॅ ग्रीफ्न, मार्क व्हाॅट्सन, शिराज जॅक (अंतराष्ट्रीय समन्वयक)आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश म्हस्के यांनी तर आभार महेंद्र घारे यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close