ताज्या घडामोडी

आडसुरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी कु. आशाताई रामकृष्ण चव्हाण तर उपसरपंचपदी सौ. सविताताई प्रकाश कोकाटे यांची बिनविरोध निवड…*

सायगाव वार्ताहर एकनाथ भालेराव

*सायगाव वार्ताहर एकनाथ भालेराव 

आडसुरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी कु. आशाताई रामकृष्ण चव्हाण तर उपसरपंचपदी सौ. सविताताई प्रकाश कोकाटे यांची बिनविरोध निवड…*

आडसुरेगाव येथे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रथमच सर्वात तरुण वयाच्या २३ व्या वर्षी व उच्च शिक्षित कु. आशा रामकृष्ण चव्हाण (M.sc) यांची बिनविरोध निवड झाली आणि युवानेते प्रकाशभाऊ कोकाटे यांच्या पत्नी सौ. साविताताई कोकाटे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी शिवनेये साहेब यांनी काम पाहिले व मदतीसाठी ग्रामसेवक आर एन ठोंबरे यांनी काम पाहिले.
निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून आनंद साजरा केला.

यावेळी नवनिर्वाचित सदस्य दिलीप चव्हाण, जानकाबाई थोरात व नानासाहेब गायकवाड यांचेही अभिनंदन करण्यात आले.

आडसुरेगाव येथे गेल्या ५० वर्षामध्ये पहिल्यांदाच ७ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती त्यामध्ये प्रकाशभाऊ कोकाटे व भास्कर आप्पा चव्हाण यांच्या पॅनल ला ७ पैकी ५ जागा मिळाल्याने बहुमताने एकहाती सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी युवानेते प्रकाशभाऊ कोकाटे, भास्कर आप्पा चव्हाण, माजी सरपंच गोरखनाथ कोकाटे, माजी सरपंच सुंदरनाथ कोकाटे, विलास चव्हाण, सोपान गायकवाड, विकासभाऊ चव्हाण, कारभारी गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले.

प्रसंगी साहेबराव चव्हाण, श्रावण चव्हाण, रामदास चव्हाण, शांताराम चव्हाण, सुनील चव्हाण, गोकुळ चव्हाण, किशोर चव्हाण, पंडीत चव्‍हाण, बाळासाहेब चव्हाण, विलास चव्हाण, योगेश चव्हाण, कैलास चव्‍हाण, दत्तात्रय चव्हाण (तात्या), मच्छिंद्र आबा चव्हाण, बद्रीनाथ चव्हाण, बाबुराव चव्हाण, जालिंदर चव्हाण, संजय चव्हाण, राजाराम थोरात, लहानु सुरासे, अण्णा सुरासे, रंजक चव्हाण, पोपट चव्हाण, जगन चव्हाण, रावसाहेब चव्हाण, बबन कोकाटे, दत्तू कोकाटे, किशोर कोकाटे, टकचंद कोकाटे, भानुदास हिवाळे, नवनाथ बिडवे, बाबासाहेब चव्हाण, बापू कोकाटे, भास्कर चव्हाण, दत्तू चव्हाण, विश्वनाथ सोमासे, संजय औताडे, राजेंद्र चव्हाण आदी ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[

वार्ताहर एकनाथभालेराव

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close