ताज्या घडामोडी

पोलीस खात्यात एक रुपया पगार घेऊन छत्तीस वर्ष काम करणारा सच्या राष्ट्रभक्त,देशभक्त मा जावेद अहमद

हेडिंग-पोलीस खात्यात एक रुपया पगार घेऊन छत्तीस वर्ष काम करणारा सच्या राष्ट्रभक्त,देशभक्त मा जावेद अहमद.

डॉ.अब्दुल कलाम यांच्या नंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळवळे असे अधिकारी म्हणजे मा. जावेद अहमद. जावेदसाहेब १९८० च्या बॅच चे IPS अधिकारी केवळ देशसेवा करायची म्हणून नोकरी करणारे,अहमदसाहेब मूळचे उत्तर प्रदेशातील नबाब घराण्यातील असून त्यांच्या घराण्यातील कोणी नोकरी करत नाहीत,आजही सर्वजन राजेशाही आयुष्य जगत आहेत. अब्जावधीच्या संपत्तीचे ते मालक आहेत.,अपवाद वडीलांचा कारण वडीलही (काझी मुख्तार अहमद) सेवानिवृत्त IAS अधिकारी होते.
१९८० मध्ये IPS होऊन नोकरीत हजर झाल्यानंतर आपण फक्त एक रूपया मासिक पगार घेऊन उर्वरित पगाराची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करायला सुरवात केली. ३६ वर्षे नोकरीतून सेवानिवृत्त होईपर्यंत हे व्रत पाळले. . मा जावेदसाहेब यांनी सेवेत असताना खाजगी कामासाठी सरकारी गाडी कधीही वापरली नाही खाजगी गाडी वापरत.,
मा जावेदसाहेब यांचा गणवेश जाड्याभरड्या खाकीचा असे, टेरिकॉटचा खाकी गणवेश त्यांनी कधीच परिधान केला नाही. साधेपणा हा सरांचा स्थायीभाव होता, म.गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता.
नवी मुंबईत पोलीस आयुक्त असताना सरांनी स्वत:चा मोबाईल सार्वजनिक केला होता. मोबाईलवर कोणीही बोलू शकत असे.,समक्ष असणाऱ्यांचे कोणी ऐकून घेत नाहीत ही सार्वत्रिक परिस्थिती असताना सरांचे कौतुक वाटते., माणूसकीचा गहिवर सरांच्याकडे असल्यानेच हे शक्य झाले असावे.
नवी मुंबई येथे असताना महिलांसाठी हेल्पलाईन सुरू केली. महिलांसाठीच्या हेल्पलाईनचे जनक म्हणून मा.जावेदसाहेब यांना ओळखलं जाते.
दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेजातून सरांनी पदवी घेतली होती. सर डिसेंबर, २०१५ ला सेवानिवृत्त झाल्याबरोबर मा प्रधानमंत्री यांनी त्याची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. पोलीस खात्यातून निवृत्ती नंतर राजदूत होण्याचा बहुमान मा रिबेरोसरांचे नंतर मिळविणारे केवळ दुसरेच मा. जावेदसाहेब आहेत,पगार भरपूर असूनही भ्रष्टाचारी आपण बघतो, समाजाचं त्यांना काही देणं-घेणं नसतं.,वेदना, व्याकुळता, करूणा पाहून त्यांच मन कधी व्याकूळ होत नाही. आपल्याचं मस्तीत/धुंदीत ते वावरत असतात. लाज,लज्जा काही नसते, केवळ स्टेजवर राष्ट्रप्रेमाच्या गप्पा झोडून तत्त्वज्ञान ओकत असतात. जनाची नाही तरी मनाचीही लाज वाटत नाही. अशा वेळी मा.जावेदसाहेब यांच्यासारखा माणूस आपला वाटायला लागतो. खराखुरा राष्ट्रभक्त म्हणून मनात स्थान निर्माण करतो. आजही सर्वच खात्यात काही अधिकारी मनापासून जीव तोडून काम करत आहेत.
या निमित्ताने सर्वांना एक विनंती पगारातील पैसे समाजासाठी खर्च नाही केलेत तरी चालेल,पण समाजाला ओरबडू नका.
मा.जावेद अहमद साहेब आपल्या सारखा देशसेवा करणाऱ्या राष्ट्रभक्तास जय हिंद…

बातमी व जाहिरात साठी संपर्क.
महेश पवार (मिरज प्रतिनिधी) 84849 90076
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close