ताज्या घडामोडी

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील संतोष खैरनार यांची निवड

येवला : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील संतोष खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते संतोष खैरनार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ, ३८ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर, प्रकाश बागल आदी उपस्थित होते. संतोष खैरनार यांनी येवला ग्रामीणमधून विविध वर्तमान पत्रातून बातमीदार म्हणून काम केले आहे. तसेच आजही ते विविध वृत्तपत्रातून मुक्त पत्रकार म्हणून काम करीत आहेत.

परिषदेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या

गेल्या वीस वर्षापासून समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले समता परिषदेत खैरनार विविध जबाबदाऱ्या सांभाळत असून, त्यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close