ताज्या घडामोडी

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश कोपरे यांच्या निधनाने खरा पँथर हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश कोपरे यांच्या निधनाने खरा पँथर हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
भारती धिंगान ( प्रतिनिधी)
मुंबई दि. 14 – आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश त्रिंबक कोपरे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यातील खरा ज्येष्ठ पँथर हरपला अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत प्रकाश कोपरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे दिवंगत प्रकाश कोपरे यांची सर्वपक्षीय जाहीर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती..त्यावेळी ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइं चे काकासाहेब खंबालकर; श्रीकांत भालेराव; सुरेंद्र थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत प्रकाश कोपरे यांनी भारतीय दलित पँथरला आपले कुटुंब मानले होते. अनेक कार्यक्रम;आंदोलन;मोर्चे यात ते स्वतःला झोकून देऊन काम करीत असत. पानाची टपरी चालवीत आपला चरितार्थ चालवीत त्यांनी भारतीय दलित पँथर ची जिल्ह्यात चळवळ चालवीत होते.प्रकाश कोपरे यांनी आंबेडकरी चळवळीत दलित पँथर मध्ये दिलेल्या योगदानामुळे त्यांचे नाव जिल्ह्यात अजरामर राहील अशी भावपूर्ण श्रद्धांजली ना रामदास आठवले यांनी दिवंगत प्रकाश कोपरे यांना वाहिली. प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी माहिती दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close