ताज्या घडामोडी

कोरोनाच्या काळात बंद झालेल्या एस.टी.बस सेवा रोडवर सुरळीत धावण्यासाठी खालापूरातील ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कर्जत, पनवेल येथे पत्रव्यवहार

कोरोनाच्या काळात बंद झालेल्या एस.टी.बस सेवा रोडवर सुरळीत धावण्यासाठी खालापूरातील ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कर्जत, पनवेल येथे पत्रव्यवहार

 

खालापूर – समाधान दिसले

कोरोनाच्या काळात गेले अनेक महिने बस सेवा बंद राहिल्या मात्र आता कोरोना चा प्रादुर्भाव हळुहळु कमी होत असतांना शिवाय आता शाळा तसेच कारखाने सुरु झाले असून या माध्यमातून शाळकरी मुले आणी कामगार वर्गांचे मोठी समस्या निर्माण होत आहे. खोपोली – वाशिवली, वाशिवली – पनवेल – खोपोली लोहप मार्गी कर्जत एस.टी.बस सुरु करण्यासाठी सहकार्य करावे या दृष्टीकोणातून ग्रूप ग्राम पंचायत सावरोली, कुंभिवली, माडप, माजगांव, इसांबे,शवडगांव आदी ग्रामपंचायतच्या सरपंच तसेच ग्रामसेवक सदस्य यांनी एक ठराव घेवून एस.टी. बस सुरु करण्यासाठी निवेदन देण्यासाठी ग्रुप ग्राम पंचायत सरपंच गोपीनाथ जाधव यांचा सातत्याने पुढाकार घेत असल्यामुळे सर्व स्तरातून अनेकांनी समाधान व्यक्त केले.
तसेच विलास कांबळे, सामाजिक कार्यकर्ते जयवंत पाटील, तुकाराम जाधव, तंटा मुक्ती अध्यक्ष अरुण जाधव, आदि या सर्वांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले.

सावरोली ते वाशिवली या विभागात ६
ग्राम पंचायत येत असून या ३५ ते ४० वाड्या तसेच अनेक गावे जोडली गेली आहेत. मात्र एस.टी बस सेवा सुरु होत नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील आणि खालापूर पंचायत समिती उप सभापती विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य सरपंच ग्रामसेवक यांनी एक बैठक घेवून आणि प्रत्येक ग्रामपंचायतनी पत्र तयार करून माजगाव सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या पुढाकारातून हे निवेदन पनवेल तसेच कर्जत आगारा येथे देण्यात आले. त्यांच्या या निर्णयामुळे एस.टी.बस सेवा सुरु होत असल्यामुळे कामगार तसेच शाळेय विद्यार्थी यांच्यामध्ये चैतन्यांचे वातावरण निर्माण होत आहे.
या ग्रामपंचायतीला अनेक गावे जोडले गेले आहे. यामुळे या गावामधून दुसऱ्या तालुक्यात किंवा गावामध्ये कामाला तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खुप असल्यामुळे तातडीने या एस.टी.बस सेवा सुरु करावी त्याच बरोबर खाजगी वहानांचे दर पेट्रोल, डिजेल वाढल्याने सातत्याने वाढत असल्यामुळे शिवाय वय वृद्ध यांना एस.टी.मध्ये सवलत असल्यामुळे हा प्रवास खुप सोयीस्कर होत असतो.

चौकट –
आम्ही सहा ग्रामपंचायत मिटिंग घेवून बस सुरु करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील. पंचायत समिती सभापती विश्वनाथ पाटील यांचे सहकार्यातून मी आणी माझे सहकार्य कर्जत, पनवेल आगार येथे सर्व ग्रामपंचायतीचे बस सुरु करण्याचे निवेदन देण्यात आले.
(माजगांव ग्रामपंचायत सरपंच – गोपीनाथ जाधव )

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close