ताज्या घडामोडी

खोपोली शिशु मंदीर विद्यालयातील फी संदर्भात पालक वर्ग आक्रमक, केटीएसपीच्या कार्यालयावर धडक देत फी कमी करण्याची केली मागणी.

खोपोली शिशु मंदीर विद्यालयातील फी संदर्भात पालक वर्ग आक्रमक, केटीएसपीच्या कार्यालयावर धडक देत फी कमी करण्याची केली मागणी.

खालापूर – समाधान दिसले

खोपोली शहरात शिशु मंदिर हे विदयालय इंग्रजी माध्यमाचे असून या विदयालयात असंख्य ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत असून हा विदयालय नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चित असतो. पुन्हा एकदा हे विदयालय चर्चेचा विषय बनला असुन या विदयालयात व्यवस्थापन व पालक असा संघर्ष पुन्हा पेटला आहे. गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांना पूर्ण फी भरण्याची ताकीद देण्यात आल्याने ही फी भरण्यास पालक वर्ग हतबल झाल्याचे पाहायला मिळाल्याने ही फी भरण्यास पालकांनी विरोध दर्शवल्याने 13 फेब्रुवारी रोजी सर्व पालक वर्गानी के.टी.एस.पी.च्या कार्यालयावर धडक देत फी मध्ये सवलत देऊन काही प्रमाणात फी माफ करा अशी मागणी के.टी.एस.पी.चे अध्यक्ष संतोष जंगम, कार्याध्यक्ष किशोर पाटील, शिशु मंदीर चेअरमन विजय चुरी यांच्या कडे केली. तर काही काळ चर्चे दरम्यान पालक व उपस्थित व्यवस्थापन यांच्यामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले असुन या चर्चेतून सकारात्मक निर्णय काढून पालक वर्गाला शांत करण्यात आले.

खालापुर तालुका शिक्षण मंडळाच्या खोपोलीतील इंग्रजी माध्यमातील शिशु मंदीर शाळेच्या पालकांवर अवाजवी लादलेल्या फि कमी करण्या बद्दल विचारणा करण्यासाठी दि. 9 फेब्रुवारी रोजी शाळेच्या मुख्याध्यापिकां कडे गेले असता. यावेळी पालकांच्या दबावाला झुगारताना पालकांबद्दल अपशब्द काढल्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरल्याचे पाहायला मिळाल्याने सर्व पालकांनी मंडळाच्या पदाधिका-यांना संपर्क करण्यात प्रयत्न करीत होते. परंतु मंडळाच्या पदाधिका-यांची भेट होत नसल्याने पालकांनी खालापुर पंचायत समिती येथे अतिरीक्त गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांची भेट घेतल्यानंतर शनिवार 13 फेब्रुवारी रोजी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्याध्यक्ष किशोर पाटील व शिशु मंदीरचे चेअरमन विजय चुरी यांची पालक किरण हाडप, रेश्मा आंग्रे, नितेश पाटील, गोपिनाथ सोनावणे, मीना दिसले, अनिल मिंडे, सारीका सावंत, गजानन पाटील यांच्यासह अन्य पालकांनी भेट घेत यावेळी फि कमी करण्याबाबत चर्चा करून सकारात्मक तोडगा निघाल्याने पालक वर्गामध्ये शांतता पसरली.

तर शाळा चालु नव्हत्या तसेच वेगळ्या ऍक्टिव्हिटी ची फी का भरावी ? आम्ही फक्त ट्युशन फी भरणार ती पण 10 महिन्याचीच तसेच शिक्षकांनी ऑनलाइन मध्ये व्यवस्थित शिकवल नाही, ज्या विद्यार्थांनी फी भरली नाही त्यांना ग्रुप मधून काढून टाकले त्यांना परत ग्रुप मध्ये घ्यावे, जो पर्यंत फी कमी चा निर्णय होत नाही तो पर्यंत आम्ही फी भरणार नाही असे यावेळी पालकांनी ठणकावुन सांगितले असून मंडळाचे अध्यक्ष संतोष जगंम व कार्याध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले की आम्ही कमिटी मेंबर, शिक्षक व पालक प्रतिनीधी एकत्र बसून यावर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close