ताज्या घडामोडी

विकाससम्राट* *नामदार छगनरावजी भुजबळ साहेब*

– All right are © reserved –

*विकाससम्राट*
*नामदार छगनरावजी भुजबळ साहेब*

*- पालकमंत्री भुजबळ साहेब यांच्या पाठपुराव्याला अखेर यश,नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मंत्रि मंडळाची मान्यता मिळाली; नाशिक जिल्ह्यात ह्या मान्यते मुळे शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडून येणार आहे.*

*- लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्याला ५०० कोटी सर्वसाधारण वार्षिक योजना,३०० कोटी आदिवासी बजेट,१०० कोटी विशेष घटक योजनेसाठी एकूण ९०० कोटी चे बजेट लोकनेते भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्याला मिळाले.*

– जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज नव्हते; वैद्यकिय शिक्षणाचे मुख्य विद्यापीठ MUHS हे नाशिक येथे आहे; पण शासकीय कॉलेज ची कमतरता होती त्यामूळे नाशिक जिल्हा वैद्यकिय क्षेत्रात इतर जिल्हा च्या तुलनेत कमी पडत होता पण भुजबळ साहेब यांच्याचं पाठपुराव्यामुळे हे देखील मोठ्ठं यश जिल्ह्यात खेचून आणण्याची किमया साहेब यांनी केली.

– त्याच बरोबर नाशिक जिल्ह्यासाठी १५२ कोटी रुपयांचा वाढीव निधी साहेब यांनी मंजूर करून घेतला; नाशिक जिल्हा साठी ९०० कोटी चा निधी लोकनेते भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्याला मिळाला; त्यामुळे जिल्ह्याचा पुन्हा नव्याने विकास करण्यास लोकनेते भुजबळ साहेब कटीबद्ध राहतील.

– मागील भाजप सेना युती च्या काळात नाशिक जिल्ह्याचे पालकत्व करतांना पोरका झाला होता; जिल्ह्याला कार्यसम्राट पालकमंत्री न मिळाल्या मुळे जिल्हाची मोठी हानी झाली होती आज तोच विकासाचा बॅकफुट भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्याचे जनतेच्या मनातील पालकमंत्री लोकनेते साहेब सदैव प्रयत्नशिल आहे.

– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे १५१ व्या वर्षात शासनाने दिलेली अभूतपूर्व भेट आहे,पदव्युत्तर अभ्यासक्रम तात्काळ सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब देणार आहे.

– नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या अधिनस्त १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रूग्णालय सुरु करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रि मंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, ही मान्यता म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या १५१ व्या वर्षात राज्य शासनाने जिल्हावासीयांना दिलेली एक अभूतपूर्व अशी भेट असून त्याच बरोबर ती एक मोठी उपलब्धीही आहे, येत्या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ केंद्र सरकारला सादर करण्याच्या सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी दिल्या आहेत.

– नाशिक १५१ च्या माध्यमातून जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांचा शाश्वत विकास करण्यावर लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब विशेष भर देणार आहे.

*अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण*

✍️✍️
कमलेश पैठणकर
(वादळी प्रवास)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close