ताज्या घडामोडी

मनसेत पक्षप्रवेशाचा धडाका, कृष्णकुंजवर ‘मेगाभरती’* *ईगतपुरी व येवला तालुक्यातील शिवसेनेचे अनेक सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा मनसेत प्रवेश.*

कपील कट्यारे नाशिक

*मनसेत पक्षप्रवेशाचा धडाका, कृष्णकुंजवर ‘मेगाभरती’* *ईगतपुरी व येवला तालुक्यातील शिवसेनेचे अनेक सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा मनसेत प्रवेश.*
नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी व येवला तालुक्यातील १२ गावांतील सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी त्यांच्या असंख्य सहकार्यांसह आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवार, दिनांक ११.०२.२०२१ रोजी ‘कृष्णकुंज’ मुंबई येथे संपन्न झालेल्या भव्य प्रवेश सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ईगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील शिवसेनेचे सरपंच कैलास भगत, ग्राम पंचायत सदस्य रामदास भगत, अशोक पवार, योगीनाथ भगत, जनार्दन भगत, टाके घोटी येथील माजी सरपंच रामदास आओडे, येवला तालुक्यातील संजय विनायक पा. जाधव, छावा संघटना, (नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष), देविदास सयाजी गुडघे, मराठा मावळा संघटना (नाशिक जिल्हा प्रमुख), शंकर झाल्टे, मराठा मावळा संघटना (नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), शेखर शिंदे, युवा सेना, (तालुका संघटक), जागृती संदीप मखरे (महीला सरपंच ) सातारे, भागुजी मारे (सरपंच दरवंडी/खरवंडी), ज्ञानेश शिवाजी सोनवणे (चेरमन वि.वि. सोसायटी) कातरणी /विखरणी, रविंद्र दाणे (ग्रामपंचायत सदस्य), हरीश विठ्ठल दाणे (ग्रामपंचायत सदस्य), नानासाहेब दौलत आहिरे (ग्रामपंचायत सदस्य), बहीरू कचरू झाल्टे (ग्रामपंचायत सदस्य), गोकुळ वाल्मिक लोहकरे (व्हा. चेरमन) कातरणी वि.वि. सोसायटी, गणेश बैरागी (ग्रामपंचायत सदस्य) पाटोदा, प्रताप पाचपुते (ग्रामपंचायत सदस्य), दिनेशचंद विश्वकर्मा, यशवंत गबाले, ऋषिकेश कुमावत, आकाश कुम्वत, विनायक दुसाने, गोपाल महाजन, गोपाल कुमावत, नितीन वाघ, देविदास बर्फ, संदीप माळी, सागर चौरे, निलेश चौरे आदि प्रमुख कार्यकर्ते व समर्थकांचा समावेश होता.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, शॅडो केबिनेट सदस्य पराग शिंत्रे, उपजिल्हाध्यक्ष कांतीकाका चौबे, भागीरथ मराडे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील, मनविसे उपजिल्हाध्यक्ष महेश लासुरे, हरिश्चंद्र चव्हाण, रामदास चव्हाण, अभिजित कुलकर्णी आदि पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close