ताज्या घडामोडी

कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील घन कचरा जाळल्याने धुराचे लोट ;प्रवासी हैराण

कचरा नक्की कोण जाळतय ? तसेच हा चुकीचा प्रकार थांबवावा अशी मागणी नागरीकातून होत आहे .

कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील घन कचरा जाळल्याने धुराचे लोट ;प्रवासी हैराण

कर्जत : विजय डेरवणकर

कर्जत रेल्वे स्थानक परिसरात एक मोठी कचरा कुंडी बांधण्यात आलेली आहे . या कुंडीत मोठ्या प्रमाणात कचरा साचतो . खरे तर हा कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याऐवजी जागेवरच जाळण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरतात . यामुळे स्थानक परिसरातील प्रवाशांना ,आजूबाजूच्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे .

    सोमवारी सकाळीही अशाच प्रकारे कुंडीतील कचरा जाळल्याने मोठया प्रमाणात धुराचे लोट पसरले . याबाबत प्रवाशी अमित चाचड यांनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली असता रेल्वे प्रशासनाने कर्जत नगर परिषदेकडे बोट दाखवत जबाबदारी झटकली तर नगर परिषदेने हि रेल्वे ची जबाबदारी आहे असे म्हणत याबाबत हात वर केले .

   त्यामुळे हा कचरा नक्की कोण जाळतय ? तसेच हा चुकीचा प्रकार थांबवावा अशी मागणी नागरीकातून होत आहे .

    तसेच याच कचरा कुंडी जवळ दुचाकी गाड्यांचे पे पार्किंग आहे . त्यामुळे चुकून वाऱ्यामुळे कचऱ्यातील ठिणग्या गाड्यांवर पडल्या तर मोठा अनर्थ घडू शकतो तरी याबाबत गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे .
——————————–

प्रतिक्रिया :

  रेल्वे स्थानकालगत असलेल्या कचराकुंडीतील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत दोनच दिवसात रेल्वे प्रशासनाबरोबर चर्चा होणार आहे . सदर जाळलेल्या कचऱ्याशी आमचा संबंध नाही .

— सुदाम म्हसे ,स्वच्छता व आरोग्य अधिकारी, कर्जत नगर परिषद
—————————————

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close