ताज्या घडामोडी

कर्जत मध्ये कृषी पर्यटन बहरतेय ..

निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक घेत आहेत भोजनाचा आस्वाद ,

कर्जत मध्ये कृषी पर्यटन बहरतेय ..

निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक घेत आहेत भोजनाचा आस्वाद ,

खवय्यांना आकर्षित करण्यासाठी जम्बो थाळी ,शेतकरी थाळी , कोळीवाडा थाळीचाही पर्याय

कर्जत : विजय डेरवणकर

      विशेष करून यापूर्वी युरोपियन देशात तेथील नागरिक आठवड्यातील सलग पाच दिवस काम करायचे आणि वीकेंडला निसर्गरम्य वातावरणात  जाऊंन  निवांत क्षण घालवायचे जेणे करून आठवड्याभराचा कामाचा थकवा जाऊन पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागता येईल . याचप्रकारे मागील काही वर्षांपासून आपल्याकडेही याचेच अनुकरण केले जात आहे . याच संधीचा फायदा घेत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कर्जतमधील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत कृषी पर्यटन व्यवसायाकडे आपली वाटचाल सुरु केली आहे .आणि विशेष म्हणजे त्यांना मुंबई पुणे आदी मोठ्या शहरातील पर्यटकांचा प्रतिसादही लाभत आहे.

   मुबंई पुण्याच्या मध्यावर असल्याने कर्जतला बाय कार ने येणे सहज आणि सोपे . त्यात तालुक्याला निसर्गाची मुक्त हस्ते उधळण हे निसर्गाचे वरदानही लाभलेले . उंच उंच डोंगर ,दऱ्या ,पांढरे शुभ्र कोसळणारे धबधबे ,जैवविविधता यामुळे पर्यटकांचे ,गिर्यारोहकांचे पावले इकडे वळले नाही तर नवलच . यामुळेच कदाचित कर्जत तालुक्यात फार्म हाऊस संस्कृतीचा उगम होऊन आज राज्यात सर्वाधिक फार्म हाऊस कर्जत तालुक्यात आहेत.

   यापूर्वी तालुक्यात रिसॉर्ट होते पण बोटावर मोजण्या इतकेच . त्यात एखादा स्विमिंगपूल आणि थोडी फार बाग एखाद दुसरे कॉटेज असायचे . मात्र आता हे स्वरूप पूर्ण बदलय . मोठे क्षेत्रफळ , चोहोबाजूला हिरवीगार झाडे , रंगीबेरंगी फुलांचे ताटवे ,आलिशान कॉटेज आणि त्यासमोर निळाशार पाण्याचा स्विमिंग पूल . पावसाळा नसूनही पावसाचा आनंद देणारा रेन डान्स शॉवर , डीजेच्या तालावर या रेन डांस शॉवरखाली थिरखत नखशिखांत  ओली चिंब होणारी तरुणाई पाहायला मिळत आहे . बच्चे कंपनीसाठी घसरगुंड्या ,सीसॉ आदी पर्याय आहेत .

   दिवसेंदिवस रिसॉर्टची संख्या वाढत असल्याने पर्यटक तथा ग्राहक आपल्या रिसॉर्ट कडे जास्तीत जास्त कसे वळतील यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबिले जात आहेत . यामध्ये विशेष करून खवय्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे . जम्बो थाळी ,शेतकरी व्हेज थाळी ,कोळीवाडा थाळी आदी मेनूचा समावेश आहे .

    पाहुणचार रिसॉर्ट मध्ये शेतकरी थाळी 1500 ,कोळीवाडा थाळी 2500 तर पाहुणचार स्पेशल  थाळी 3000 असे दर असूनही पर्यटक आनंदाने याचा आस्वाद घेतल्याचे रिसॉर्टचे मालक आबासाहेब पवार यांनी सांगितले . एक थाळी मागिवली कि त्यात पाच ते सहा जण सहज पोटभर जेवतात . या थाळ्यांमध्ये  विविध प्रकारच्या मासे ,चिकन  ,मटण याचा समावेश असतो .

     उत्कर्ष रिसॉर्टचे मालक उदय पाटील यांनी तर त्यांच्याकडे येणारे काही ग्राहक सकाळच्या नाश्त्याला कांदा पोहे ,इडली ,मिसळ ऐवजी सुकटीची चटणी आणि भाकरिची विशेष फर्माईश करतात . आणि आम्ही त्यांची ती फर्माईश पूर्ण करतो असेही पाटील यांनी सांगितले .

    काही रिसॉर्ट मध्ये प्रतिदिन चहा नाश्ता दोनवेळच्या जेवण सहित 2000 तर काही रिसॉर्ट मध्ये 1500 रुपयात हि सुविधा मिळते .

   शनिवार रविवारी तर ऍडव्हान्स बुकिंग केल्याशिवाय प्रवेश मिळणे कठीणच . या रिसॉर्ट मध्ये नुसते विकेंड साजरे करणारे नाहीतर छोटे खानी कार्यक्रम करू पाहणारे उदा . मित्र मैत्रिणीचा बर्थ डे ,साखरपुडे आदी सोहळ्यांसाठीही रिसॉर्टला मागणी आहे .

    एकंदरच भविष्यात कृषी पर्यटनाला सुगीचे दिवस येणार असे म्हटल्यास वावगे ठरू नये .
—————————————-

चौकटीतील मजकूर

   कर्जत तालुक्यात पेठचा किल्ला ,कोंढाणे -आंबिवली लेणी ,प्राचीन होळकर तलाव ,कडावचे गणेशाचे जागृत बाल दिगंबर मंदिर , पळसदरी येथील श्री स्वामी समर्थांचा मठ ,वामनराव पै विद्यापीठ आदी पर्यटन स्थळे असूनही कर्जतला अपेक्षित असा पर्यटनाचा दर्जा मिळालेला नाही त्यासाठी शासनाने पुढाकार घायला हवा . पर्यटन वाढला तर रोजगाराच्याही संधी उपलब्ध होतील .——————————————–

धबधब्यांवरील बंदी उठवावी ..

   सोलन पाडा , आषाणे कोषाणे धबधबा असे अनेक धबधबे पावसाळ्यात कोसळत असतात . यावेळेस वर्षा सहलीच्या निमित्ताने अक्षऱहा हजारो पर्यटक तालुक्यात येतात मात्र या ठिकाणी काही पर्यटकांचा अपघाती मृत्यू झाल्याने धबधब्यावर जाण्यास बंदी घातल्याने पर्यटक कमी झाले . परिणामी त्या त्या व्यवसाय ,रोजगार बुडाला .

   तरी शासनाने यावर सकारात्मक भूमिका घेत पर्यटकांची काळजी घेत त्यांना योग्य सोयी सुविधा पुरवत प्रवेश द्यावा , बंदी उठवावी . यामुळे तालुक्यातील पर्यटन व्यवसाय नक्कीच वाढेल यात शंका नाही .
—————————————-

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close