ताज्या घडामोडी

म.रा.पदवीधर प्राथ.शिक्षक व केंद्रप्रमुख सभा शाखा दिंडोरी ची तालुका कार्यकारीणी सभा संपन्न

म.रा.पदवीधर प्राथ.शिक्षक व केंद्रप्रमुख सभा शाखा दिंडोरी ची तालुका कार्यकारीणी सभा संपन्न…….

निफाड तालूका प्रतिनिधी:मनोहर देसले.

म.रा.पदवीधर व केंद्र प्रमूख सभा संघटनेचे नुकतेच निफाड येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर झाले. त्यातील मार्गदर्शक सुचनेनुसार तालुका कार्यकारीणीची बैठक दिंडोरी तालुका प्राथ.शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात पतसंस्थेचे चेअरमन तथा जिल्हा नेते, दिंडोरी पदवीधर शिक्षक संघटनेचे आधारस्तंभ आदरणीय श्री.राजेंद्रजी गांगुर्डे साहेब[केंद्रप्रमुख] यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी तालुका शाखा रेकाँर्ड अद्ययावत, संघटनात्मक आढावा,प्रत्येक बीटनिहाय माहीती,पदवीधरांचे विविध प्रश्न विशेषतः अनेक दिवसांपासून रखडलेला भाषा व समाजशास्त्र पदवीधरांचा प्रश्न,सभासद नोंदणी अभियान तसेच कार्यकारीणीचा विस्तार व पुढील करावयाची कामे याविषयी सखोल चर्चा झाली व प्रत्येक तालुका सदस्याची मते जाणुन घेण्यात आले तसेच पुढील नियोजन करण्यात आले.
यावेळी दिंडोरी तालुका प्राथ.शिक्षक पतसंस्थेने अवघ्या चारच वर्षात केलेल्या प्रगतीचा आलेख चेअरमन गांगुर्डे साहेब व तद्म संचालक विलास पाटील यांनी मांडला.व पतसंस्थेला कोणतीही झळ न बसता तयार करण्यात आलेल्या पतसंस्थेच्या सुबक कँलेडरचे वाटप करण्यात आले.तसेच कार्यकर्ता शिबीरातील प्रशिक्षणरूपी मार्गदर्शक माहिती जिल्हा नेते एकनाथ अहिरराव व रमेश मोरे सरांनी दिली. तालुकाध्यक्ष जयदीप गायकवाड यांनी वर्षभरातील लेखाजोखा प्रगती अहवाल मांडला.कार्यकारीणीतील सर्व सदस्यांनी संघटना बळकटीकरणासाठी विविध पैलू सविस्तर उघडून चर्चा केली.तालुका मेळावा प्रंसगी सविस्तर माहीतीचे आदानप्रदानाचे नियोजन करण्यात आले.
सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तु देऊन सामाजिक कार्य करणार्या दशकपूर्ती कार्यपुस्तिका दिंडोरी तालुका समन्वयक जयदीप गायकवाड यांनी व्यासपीठास पदवीधर संघटनेचे सल्लागार , DTPT चे तद्म संचालक विलास पाटील.जिल्हा नेते एकनाथ अहिरराव,
जिल्हा चिटणीस मा.अध्यक्ष रमेश मोरे,तालुकाध्यक्ष जयदीप गायकवाड,
सरचिटणीस मनोहर देसले,कार्याध्यक्ष गोविंद ढेपले,
उपाध्यक्ष कांतीलाल भरसट, कोषाध्यक्ष रमेश पवार, कार्या.चिटणीस तुषार भदाणे सर यांनी संघटनात्मक जबाबदारी कशी असते यावर सविस्तर चर्चा केली व शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close