ताज्या घडामोडी

पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ मागे घ्यावी यासाठी मोदी सरकारच्या विरोधात सांगली शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन

हेडिंग-पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ मागे घ्यावी यासाठी मोदी सरकारच्या विरोधात सांगली शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन.

आज दिनांक 3/2/2021 बुधवारी सकाळी 11 वाजता शिवसेनेच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने उपतालुका प्रमुख अनिल शेटे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महिला आघाडी सांगली शहर प्रमुख मानसी जितेंद्र शहा यांच्या नियोजनाखाली केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढ मागे घ्या यासंदर्भात सदरचे आंदोलन करण्यात आले तसेच दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने कृषी उपकर व विकास उपकर या नावाखाली जनतेवर नवीन टॅक्स लागू केला आहे त्या विरोधात देखील घोषणा देण्यात आली सदरचा उपकर सुद्धा रद्द करावा यासाठी आंदोलन करण्यात आले तसेच आंदोलनातील प्रमुख मागणी अशी होती की पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटी (GST ) मध्ये करावा म्हणजे जेणेकरून पेट्रोल डिझेलचे दर 8 ते 10 रुपये ने कमी होऊन संपूर्ण भारतात एक सारखा पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्यास मदत होईल व महाराष्ट्रात 8 ते 10 रुपये डिझेल पेट्रोलचे दर कमी होतील तसेच शिवसेना महिला आघाडीने सांगली शहराच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला वर्गाने गॅस दरवाढ विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन आंदोलन छेडण्यात आले गेल्या महिन्याभरात गॅसचे दर 100 ते 125 रुपये वाढल्याने महिलावर्गाचा घरचा खर्च वाढल्याने महिला वर्गाने केंद्र सरकारची थाळी व लाटणे हातात घेऊन थाळी बजाऊं थाळीनाद आंदोलन केले यावेळी मानसी जितेंद्र शहा यांनी केंद्र सरकारने तात्काळ गॅस दरवाढ मागे घेऊन महिलावर्गना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना महिला आघाडी सांगली शहरप्रमुख मानसी शहा यांनी यावेळी केले सदरच्या आंदोलनाला अनिल शेटे, रावसाहेब घेवारे, जितेंद्र शहा, प्रभाकर कुरळपकर, बजरंग पाटील, दीपक वाघमारे, संदीप सुतार, अविनाश कांबळे, प्रियंका साली, विदुला मेहता, पद्मावती शहा, जयश्री कोळी, जयश्री शहा, स्नेहल पाटील, हेमलता शिंदे, आकांक्षा कांबळे, स्नेहल विचारे, अनुराधा पवार, रूपाली ठोंबरे, लक्ष्‍मण वडर, बाळासाहेब मगदूम, पंडितराव बोराडे, गजानन मोरे, संदीप दिंडे, संदीप शिंत्रे, प्रसाद रीसवडे, बारिद पठाण, प्रदीप बर्गे, परशुराम नरोटे,तसेच मोठया संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते व महिला उपस्तीत होते
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क.
महेश पवार(मिरज प्रतिनिधी)
84849 90076
तिकोटी(सांगली जिल्हा हेड) 9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close