ताज्या घडामोडी

सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणा संदर्भात विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जनआक्रोश आंदोलन.

बातमी आणि जाहिरात साठी संपर्क . महेश पवार(मिरज प्रतिनिधी) विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड) 9834181802

सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणा संदर्भात विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जनआक्रोश आंदोलन.

आज दिनांक 02-02-2021 रोजी सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा तर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.सुप्रीम कोर्टात

आरक्षणाला स्तगिती मिळाली आहे त्यानंतर आणि त्याच्या अगोदर ज्या नियुक्त्या होत्या त्या नियुत्या ही सरकार द्यायला तयार नाही.mpsc,mseb,आरोग्य विभाग यामध्ये आज पर्यंत 739 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत.त्या तात्काळ द्याव्यात,तसेच मराठा विद्यार्थ्यांना 50% फी माफी मिळालीच पाहिजे.सांगली जिल्ह्यातील मराठा वसतिगृह कायम स्वरूपी सुरू झाले पाहिजे,मराठा आरक्षण मधील अन्याय झालेल्या मराठा महिला उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे,खुल्या प्रवर्गातील स्पर्धा संधी कमी करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय मागे घ्या.या प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.या वेळी मोठया संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या जणआक्रोश आंदोलनाला उपस्थित होते.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क .
महेश पवार(मिरज प्रतिनिधी) विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड) 9834181802

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close