ताज्या घडामोडी

वडवळ येथे हळदी – कुंकू व महिला मेळावा संपन्न. महिलांमध्ये उत्साह, राजे प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक

वडवळ येथे हळदी – कुंकू व महिला मेळावा संपन्न.
महिलांमध्ये उत्साह, राजे प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक

 

खालापूर – समाधान दिसले

रायगड जिल्हा
खालापूर तालुक्यातील ग्रामीण वडवळ गावात राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक मराजगे व त्याच्या सहकाऱ्यांच्या वतीने महिला मेळावा व हळदी कुंकू सोहळा 31 जानेवारी रोजी वडवळ येथील रा.जि.प.शाळेच्या भव्य प्रागणांत आयोजित केल्याने या सोहळ्याला महिला वर्गानी मोठी उपस्थिती दाखवत स्त्री मनाचा हुंकार मी द्रौपदी बोलते या एकपात्री नाटयप्रयोगाचा आनंद लुटत हळदी – कुंकू सोहळा यशस्वीपणे पार पाडला.

हळद – कुंकू लावणे, म्हणजे दुसर्‍या जिवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे म्हणूनच सर्व ठिकाणी महिला हळदी – कुंकू समारंभ साजरी करित असून 31 जानेवारी सायंकाळच्या सुमारास खालापूरातील वडवळ येथील रा.जि.प.शाळेत राजे प्रतिष्ठानच्या वतीने हळदी – कुंकू सोहळासह महिला मेळावा आयोजित करण्यात आल्याने याप्रसंगी मोठ्या संख्येने तालुक्यातील महिला उपस्थित राहिल्या होत्या. तर महिलांमध्ये जनजागृती व समाजप्रबोधन व्हावे या दृष्टीने मराठी अभिनेत्री प्रेरणा देशपांडे याचा एकपात्री स्त्री मनाचा हुंकार – मी द्रौपदी बोलते हे नाटक संपन्न झाल्याने महिलांमध्ये उत्साह संचारला होता. तर राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक मरागजे, उपाध्यक्ष राजेंद्र वाळंज, बाळकृष्ण मोरे, कार्याध्यक्ष संजय जाधव, सचिव निलेश जाधव, सहसचिव निकेश जाधव, खजिनदार अजित सावंत, सहखजिनदार चंद्रकांत जाधव, सल्लागार दत्ताराम जाधव, दत्ताराम सावंत, गणेश जाधव यांनी अथक मेहनत हा भव्य दिव्य यशस्वीरित्या पार पाडल्याने सर्व महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते.

याप्रसंगी कोयना पु.म.स.से.संघ माजी अध्यक्ष पांडुरंग साळुंखे, उपाध्यक्ष लक्ष्मण मराजगे, विष्णु सावंत, जितेंद्र सकपाल, बाबूमामा मोरे, विठ्ठल मोरे, एम.डी.चालके, तुळशीराम सावंत, उमेश कदम, दत्ता सकपाळ,  सुभाष सावंत, आर.डी.सी.सी.बँक अधिकारी मिनाक्षी लोकरे, शिवसेनेच्या रेश्मा आंग्रे अनिता पाटील, सुविधा विचारे, सरस्वती सावंत, संध्या जाधव, वडवळ उपसरपंच श्वेता कुंभार, भाजपाचे शशिकांत मोरे, मोहन घाडगे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शैक्षणिक – सामाजिक – राजकीय मंडळी, पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होत्या.

याबाबत राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक मरागजे यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, सध्या स्पर्धेचा काळ सुरू असून या स्पर्धेच्या काळात महिलांना त्याचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेगळे व्यासपीठ मिळावे व महिलांमध्ये जनजागृती आणि समाजप्रबोधन घडावे यासाठी राजे प्रतिष्ठानच्या वतीने विविध महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. जेणेकरून त्यामध्ये आमुलाग्र बदल घडेल, असे मत मराजगे यांनी व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close