ताज्या घडामोडी

*जाणून घ्या ! काय स्वस्त होणार , आणि काय महागणार – पहा महत्वाचे अपडेट*

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला , मात्र त्याचा सर्व सामान्यानावर काय परिणाम होईल , किंवा काय महाग काय स्वस्त होईल ते पाहणे खूप महत्वाचे आहे

*पहा काय स्वस्त होणार ?*

● सोनं आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करून 12.5 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे सोनं-चांदी स्वस्त होणार आहे

● लेदरच्या वस्तूही स्वस्त होऊ शकतात , तसेच स्टील उत्पादनांवरची कस्टम ड्युटी घटवून 7.5 टक्क्यांवर आणण्यात आली आहे.

● तांब्यावरची ड्युटी कमी करून 2.5 टक्क्यांवर करण्यात आली आहे. त्यामुळे स्टील आणि तांब्याची उत्पादनं स्वस्त होतील.

● नायलॉन चिप, नायलॉन फायबरवरची बीसीडी घटून 5 टक्के करण्यात आली आहे , टनेल बोअरिंग मशीनवरची सूट रद्द करण्यात आली आहे.

💁‍♂️ *पहा काय महागणार?* ,

🔰 निवडक ऑटो पार्ट्सवरची ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीतही वाढ होणार आहे

🔰 सोलर इन्व्हर्टरवरची ड्यूटी वाढवून 20 टक्के करण्यात आली आहे , तसेच कापसावरील कस्टम ड्युटी वाढवून दहा टक्के करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परदेशातून आयात होणारे कपडेही महाग होतील.

🔰 कच्चं रेशीम आणि रेशमाच्या धाग्यांवरील सीमाशुल्क कर 15 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या गोष्टीही महागतील.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close