ताज्या घडामोडी

अंधारातून प्रकाशाकडे अभियान येवले शहरात संपन्न

जमात-ए-इस्लीम हिंद महाराष्ट्र येवला शाखा आयोजित

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

अंधारातून प्रकाशाकडे अभियान येवले शहरात संपन्न
जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्य च्या वतीने दि 22 जानेवारी ते 31 जानेवारी अंधारातून प्रकाशा कडे हा अभियान सप्ताह साजरा करण्यात आले आहे येवला शहर जमाते इस्लामी हिंद च्या वतीने सदर सप्ताह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला मस्जिद अल फुरकान मध्ये सदर सप्ताह चे समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद चे मौलाना नासिर पाशु ,जमाते इस्लामी हिंद नाशिक जिल्हा अध्यक्ष मौलाना फैरोज आजमी डॉ मसररत अली शाह मौलाना इस्माईल नदवी शहर अध्यक्ष जमील अन्सारी आदी उपस्थित होते याप्रसंगी अंधारातून प्रकाशा कडे अभियान चे स्वरूप व जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्य चे कार्यक्रम व उद्देश प्रस्तुत करण्यात आले कार्यक्रमच्या सुरवातीला मौलाना इस्माईल नदवी यांनी पवित्र कुराण मधील सुरेह (श्लोक) लोकांना सांगितले व त्याचे मराठी भाषांतर पत्रकार शकील शेख यांनी केले मौलाना फैरोज आजमी यांनी जमाते इस्लामी चे विविध अभिमान व उपक्रम बद्दल माहिती दिली तसेच आज होणाऱ्या धार्मिक तेढ मुळे होणाऱ्या नुकसान बद्दल जागरूक करण्याचे प्रयत्न केले प्रत्येक धर्म हा शांती व सदभावना चे आचरण करतो इस्लाम मध्ये राष्ट्रप्रेम व इतर धर्माचा आदर करणे याला खुप महत्त्व आहे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले राहुल लोणारी यांनी जमाते इस्लामी च्या उपक्रमाचे कौतुक केले व देशाला आज खऱ्या प्रकाशाची गरज आहे त्यासाठी आपण सर्व एक होऊन काम करूया असे आवाहन केले सचिन सोनवणे यांनी कोरोना काळात ज्या प्रकारे मुस्लिम समाजातील लोकांनी मदत केली व इतर सर्व समाजाने जे काम केले ते फक्त माणुसकी चे दर्शन देणारे होते समाजात जमाते इस्लामी सारख्या संघटनेचे प्रसार जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला हवे व आज मला मस्जिद परीचय या माध्यमातून झाले त्या बद्दल आयोजकांचे आभार त्यांनी व्यक्त केले
प्रकाश भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मी माझ्या आयुष्यातील 25 वर्ष महावितरण मध्ये वायरमन या पदावर मुस्लिम भागात काम केले परंतु ज्या प्रकारे आज मुस्लीम समाज जगासमोर दाखविले जाते तसे काही नही मुस्लीम समाज हा खुप भावुक व संस्कारी आहे मला कधीही हिंदू म्हणून त्यांनी भेदभाव केले नही नेहमी सहकार्य केले व आदर ही दिले अध्यक्षीय भाषणात मौलाना नासिर पाशु यांनी अंधारातुन प्रकाशाकडे अभियान म्हणजे काय याचे विश्लेषण केले आजण का पुकारले जाते त्याचे मराठी अनुवाद काय आहे लोकांना काय गैरसमज आहे त्यावर त्यांनी आजण चे मराठी भाषांतर करून वर्णन केले तसेच मस्जिद मध्ये काय काय होते नमाज कश्या पद्धतीने होते इस्लाम मध्ये पवित्रतेला काय महत्त्व आहे नमाज साठी शरीर कसे हवे मन कसे हवे याचे विस्तृत वर्णन त्यांनी करून दिले याप्रसंगी रवींद्र करमासे सुनील गायकवाड मुकुंद आहिरे वसंत घोडेराव अहिरे बाबा मुशरिफ शाह आदींसह इतर ही राजकीय सामाजिक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमच्या शेवटी सचिन सोनवणे सुनील गायकवाड रवींद्र करमासे राहुल लोणारी यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल देऊन सत्कार केले सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अजहर शाह यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष जमिल अन्सारी शकील शेख मुशताक अन्सारी इम्रान शेख मकसूद महेवी फैसल अन्सारी शाफिक अन्सारी व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम
घेतले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close