ताज्या घडामोडी

पत्रकारांमध्ये देश महासत्ता बनविण्याची ताकद-प्रतापराव दिघावकर* नांदगाव /येवला….

पत्रकारांमध्ये देश महासत्ता बनविण्याची ताकद-प्रतापराव दिघावकर*
नांदगाव /येवला….
जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही,त्यामुळे पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळले पाहिजे.भारत देश जोपर्यंत महासत्ता बनत नाही तोपर्यंत पत्रकारांचे कार्य संपणार नाही ते अविरत सुरू असले पाहिजे.पत्रकार आणि पोलीस यांची रास एकच असून त्यांचे कार्यही एकच आहे.त्यामुळे पोलीस आणि पत्रकारांच्या समनव्ययातुन सामान्य जनतेच्या प्रश्न सुटले पाहिजे.पत्रकारांच्या लेखणीत खूप मोठी ताकद असून शेतकऱ्यांचे घामाचे पैसे बुडवाल तर गाठ माझ्याशी आहे हा मथळा वृत्तपत्रांतुन छापून येताच शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी घरपोहोच केल्याचे प्रतिपादन नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मा.प्रतापराव दिघावकर यांनी केले.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नाशिक शाखेच्या वतीने सन्मान पत्रकारीतेचा २०२०-२०२१ या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.नाशिक जिल्ह्यातील पत्रकारीता क्षेत्रात आपल्या लिखाणाच्या माध्यमातुन,समाजाच्या जडणघडणीसाठी महत्वाचे योगदान व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या गुणी तसेच किर्तीवंत पत्रकारांचा मा.दिघावकर साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर तीर्थक्षेत्र येथे आयोजित कार्यक्रमात गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विलासराव कोळेकर यांनी संपूर्ण राज्यात नाशिकची कार्यकारीणी सक्रिय असून त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी,मनमाड उपअधीक्षक समरसिंग साळवे,डॉ.संतोष बजाज,राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग,मा.अशोक छाबडीया राष्ट्रीय मुख्य महासचिव मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग,महंत योगी भूषणनाथ महाराज,मुख्य संघटन महासचिव,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामजिक न्याय आयोग,राज्य उपाध्यक्ष मा.विनोदजी वर्मा,कार्यकारणी सदस्य प्रकाश वांजोळे,नांदगाव नगराध्यक्ष मा.राजेश कवडे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार,उप सभापती मा.अर्चना वाघ आदी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
    याप्रसंगी बळवंत आव्हाड व भास्कर कदम यांना जीवनगौरव पुरस्कार,प्रा.श्रीकांत सोनवणे यांना गुरुवर्य पुरस्कार,अशोक परदेशी यांना सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार तर किरणकुमार आवारे,संतोष देवरे,हर्षद गर्दे,चिंतामण पवार,रामदास कदम,बापू चव्हाण,संदीप गुंजाळ,योगेंद्र वाघ,भाऊसाहेब शिंदे,सैय्यद कौसर,गोरक्षनाथ जाधव,कैलास उपाध्ये,राजेंद्र दिघे,भाऊसाहेब गोसावी,अरुण हिंगमीरे,योगेश बच्छाव,कल्पेश बागुल,गोरक्षनाथ लाड,विनोद देवरे यांनाही उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा कार्यकारीणी सदस्यांनी प्रयत्न केले.
———
चौकट-शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ख्यात असलेले दिघावकर साहेब येणार हे ऐकून केवळ त्यांना बघण्यासाठी शेतकरी देखील उपस्थित होते.दिघावकर साहेब कार्यक्रम स्थळावरून प्रयाण करत असतांना एक शेतकऱ्याने चक्क त्यांना सास्टाग दंडवत घातले.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close