ताज्या घडामोडी

६८ वीज चोर ग्राहकांना महावितरणचा झटका, १८ लाख ११ हजारांचा दंड

६८ वीज चोर ग्राहकांना महावितरणचा झटका, १८ लाख ११ हजारांचा दंड.

प्रतिनिधी – पिंपळगाव बसवंत.
पिंपळगाव बसवंत महावितरण विभागाने,६८ ग्राहकांवर १८ लाख ११ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरापासून असलेल्या कोरना संकटामुळे ग्राहकांनी विज भरणा भरला नाही. त्यामुळे महावितरण विभाग तोट्यात जात आहे. विज पुरवठा तुलनेत विज चोरीमुळे महावितरणची डोकेदुखी वाढली आहे. विज बिलाच्या रक्कमेत कमालीची घट झाल्याने, ३८ गावांमध्ये २८ हजार शेती व घरगुती ग्राहक आहे. दोन कोटी ४० लाख रुपये मासिक बिलाची उदिश्टेपेक्षा विजेचा वापर अधिक होता. चोरितून विजगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार पिंपळगाव बसवंत, पालखेड, दावचवडी, साकोरे, वरखेडा, पाचोरे ( वणी), खेडगाव, वणी, चींचखेड, उंबरखेड, कोकण गाव, जळूके, अशा अकरा गावांत विज चोरीचे अजब फंडे पाहून विज वितरण कंपनीचे अधिकारीही चक्रावले आहे.
पालखेड ओझारखेड कालव्याला आर्वतन सुरू असल्याने शेतीला पाणी भरण्यासाठी पंपांना आकडे टाकून वीजपुरवठा घेतला जात आहे.
मीटरमध्ये फेरफार केल्याचे प्रकार देखील अनधिकृत ग्राहक पथकाच्या निदर्शनास आले आहे. विज चोरणाऱ्यावर मोठी संक्रांत आली आहे. ६८ जणांवर कारवाई करून १८ लाख ११ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तर ५१ जणांकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल केला. फेरफार केलेले मीटर, आकडे टाकण्यासाठी वापरलेली वायर जप्त करण्यात आली आहे.
उपकार्यकारी अभियंता, एकनाथ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक अभियंता नितीन पगारे, मंगेश नागरे, चंद्रशेखर निकम, रामप्रसाद थोरात, योगेश्वर नाठे, विकास नवसारे, विशाखा गायकवाड आदी कर्मचारी पथकाने ही कारवाई केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close