ताज्या घडामोडी

राष्ट्रपती पुरस्कार विजेते व उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तकाचे लेखक अशोक कुमावत सरांचा माणिकखांब ग्रामस्थांच्या वतीने सत्कार*

वृृृृत संकलन एकनाथ भालेराव:-

*राष्ट्रपती पुरस्कार विजेते व उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तकाचे लेखक अशोक कुमावत सरांचा माणिकखांब ग्रामस्थांच्या वतीने सत्कार*
माणिकखांब :- माणिकखांब ,ता.इगतपुरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्हा परिषद शाळा माणिकखांब येथील अशोक कुमावत सरांचा त्यांनी लिहिलेल्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तकाने अल्पावधीतच अटकेपार झेंडा रोवला .महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात सोनेरी पान निर्माण केले.त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .
माणसाच्या जगण्याला बळ देणारे यशाचे शिखर जिंकण्या साठी सदैव साथ देणारे पुस्तक हातात पडले तर ती व्यक्ती स्वस्तच बसु शकत नाही एका महिन्यात उठा तुम्ही जिंकणारच या पुस्तकाने संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता प्रत्येक जिल्हा काबीज केला आहे एवढ्या वर न थांबता या पुस्तकाचा प्रवास गुजरात तेलंगण या राज्यसह सिंगापुरच्या सिमे पर्यंत पोहचला आहे हे पुस्तक दिवसेंदिवस आपली घोडदौड चांदा ते बांदा करत नवा इतिहास रचत आहे यातच या पुस्तकाचे यश दडलेले आहे.
यावेळी माणिकखांब गावचे सरपंच अंजनाबाई चव्हाण उपसरपंच वनिता चव्हाण मनसेचे उपतालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण ग्रा पं.सदस्य संतोष चव्हाण शिवसेनेचे शाखा प्रमुख भारत भटाटे ग्रा.पं.सदस्य शाम चव्हाण मा.उपसभापती विष्णु चव्हाण ग्रामसेवक समाधान सोनवणे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी.मा.उपसरपंच भिमाबाई चव्हाण चव्हाण ग्रा.पं.सदस्य अशोक पगारे ग्रां.पं.सदस्य.संजय भटाटे ग्रां.पं.सदस्य सुकराज म्हसणे मुख्यध्यापक राजेंद्र मोरकर सर ,ज्ञानगंगा माध्यमिकचे मुख्याध्यापक गवळी सर ,आहेर सर, पवार सर ,आहेरराव सर देवरे सर ,बच्छाव सर ,बागड सर,हिरे सर ,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण,वसंत चव्हाण , निवृत्ती मामा चव्हाण मनोहर मामा चव्हाण आदीसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close