ताज्या घडामोडी

नडोदे येथे दोन सख्खे भारतीय सैनिक भावांचा प्रजासत्ताक दिनी भव्य सत्कार,

नडोदे येथे दोन सख्खे भारतीय सैनिक भावांचा प्रजासत्ताक दिनी भव्य सत्कार,

तसेच संगीत भजन स्पर्धेचा मानकरी ठरला आई एकविरा महिला भजनी मंडळ डोबींवली.

खालापूर – समाधान दिसले

           सर्वत्र ठिकाणी 26 जानेवारी रोजी  71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आल्याने सर्व भारतीय वासियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत असंख्य कार्यक्रम पार पडले असून खालापूर तालुक्यातील ग्रामीण नडोदे गावातील ग्रामस्थांच्या वतीने भारतीय सैनिकांच्या सत्कार समारंभाच्या प्रित्यर्थ संगीत भजन स्पर्धा संपन्न झाल्याने या अटीतटीच्या भजन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो डोंबींवली भजनी मंडळ  तर द्वितीय क्रमांक इंचुबे भजनी व तृतीय क्रमांक सांताक्रुझ भजनी ठरल्याने सर्व विजयी भजन मंडळांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच यावेळी नडोदे गावातील देश सेवा करणारे दोन सख्ये भाऊ भारतीय सैनिकांचा भव्य सन्मान करीत त्याच्या कार्याचा गौरव केला. तर यादिवशी नडोदे गावात विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम संपन्न झाल्याने नडोदे गावात नवचैतन्य पसरले होते.

नडोदे गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभल्याने या गावात वर्षभर अनेक धार्मिक व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम पार पडत असुन 26 जानेवारी रोजी 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारत देशाच्या सैनिकांच्या सत्कार समारंभा प्रित्यर्थ संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या संगीत भजन स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 18 नामवंत भजनी मंडळीनी सहभाग दर्शवत आपली कला सादर केल्याने संगीत भजन स्पर्धेत वेगळीच रंगत चढल्याने या संगीत भजन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या आई एकविरा महिला भजनी मंडळ डोबींवली ला 10000 हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह, व्दितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या शारदा संगीत भजनी मंडळ इचुंबे ला 5000 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक ठरलेल्या आई भवानी भजनी मंडळ सांताक्रूझ ला 2500 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले असुन या सोहळ्याप्रसंगी भारतीय सैनिक तुषार तुळशीदास येरुणकर व कुणाल तुळशीदास येरुणकर या देश सेवक दोन सख्या भावांचा भव्य सत्कार करीत त्याच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याने या दोन्ही देश सेवकांच्या आईबाबांना गहिवरुन आल्याचे पाहायला मिळाले.

तर यावेळी शाहीर गणेश ताम्हाणे याचे शाहीरे पोवाड्यानी समाज प्रबोधनाचे धडे मिळाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close