ताज्या घडामोडी

दिंडोरी येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून रूम टू रिड वाचनालयाचे उद्घाटन

दिंडोरी येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून रूम टू रिड वाचनालयाचे उद्घाटन नाशिक

शांताराम दुनबळे नाशिक

-:नाशिक जिल्हा वाचनालय विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद दिंडोरी क्र.३ शाळेत प्रासत्ताकदिना चे औचित्य साधून रुम टू रिड केंद्र स्तरीय वाचनालयाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले.

प्रजास्ताकदिना चे औचित्य साधून दिंडोरी येथील जिल्हा परिषद शाळेत रूम टू रिड या केंद्र स्तरीय वाचनालयाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमासाठी दिंडोरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण गायकवाड,शालेय पोषण आहार अधिक्षक रुपाली पगार, विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रुम टु रिड उपक्रमाचे समन्वयक ओमकार हरम ,केंद्रप्रमुख परशुराम चौरे, विस्तार अधिकारी के पी सोनार,एस डी अहिरे,वंदना चव्हाण,मंगला कोष्टी, मुख्याध्यापक प्रवीण देशमुख,पंढरीनाथ भरसट, केदारे सर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक प्रवीण देशमुख यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
यावेळी वाचनालयाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी रूम टु रिड या कार्यक्रमाचे समन्वयक ओमकार हरम यांनी रूम टू रिड या कार्यक्रमाची माहिती दिली.केंद्रात बालस्नेही वाचनालय निर्माण करून वाचन विकास करणे व वाचनाची गोडी मुलामध्ये निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे हरम यांनी सांगितले. जुट बॅग मध्ये आकर्षक पुस्तकाची मांडणी व बाल स्नेही पुस्तकांची रचना या मुळे विद्यार्थी वाचनाकडे आकर्षित होतील असे हरम यांनी सांगितले. केंद्रप्रमुख परशुराम चौरे यांनी या वाचनालयाचा केंद्रातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना होईल,त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित होईल असे सांगितले. गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी पुस्तकाचं स्तरिकरण त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फलदायी ठरतील असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी आशा पाटोळे,रोहिणी परदेशी, योगेश भावसार,अश्विनी जाधव, पौर्णिमा दीक्षित,रिना पवार, समाधान दाते, दीपक पाटील,वैशाली तरवारे,कल्पना गवळी,आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close