ताज्या घडामोडी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची केली पाहणी*

*भारती धिंगान(प्रतिनिधी)*
*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची केली पाहणी*

मुंबई दि.24 -रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले आज रविवार दि.24 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली.सिरम इन्स्टिट्यूटला नुकतीच अगा लागून 5 कर्मचारी मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर ना रामदास आठवले आज सिरम इन्स्टिट्युट ला भेट देऊन पाहणी केली.कोरोना महामारीवर औषधी लस बनवून सिरम इन्स्टिट्युटने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली असल्याने सिरम इन्स्टिट्युट एक महत्वाची इन्स्टिट्युट ठरली आहे.पंतप्रधानांनी सिरम इन्स्टिट्युट ला भेट देऊन कोरोना वरील लस बनविण्याच्या तयारी ची माहिती घेऊन या इन्स्टिट्युटच्या संशोधकांना संचालकांना प्रोत्साहीत केले होते. त्यामुळे सिरम इन्स्टिट्युट ला अगा लागल्याची चर्चा मोठी झाली असून आज रविवारी दुपारी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले सिरम इन्स्टिट्युटला भेट दिली.यावेळी रिपाइं चे माजी उप महापौर डॉ सिद्धार्थ धेंडे; परशुराम वाडेकर;असित गांगुर्डे; संजय सोनवणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close