ताज्या घडामोडी

कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन तर्फे कर्जत रेल्वे स्थानकात हळदी कुंकु समारंभ उत्साहात साजरा

कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन तर्फे कर्जत रेल्वे स्थानकात हळदी कुंकु समारंभ उत्साहात साजरा

कर्जत विजय डेरवणकर

र्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन तर्फे नुकतेच कर्जत रेल्वे स्थानकात हळदी कुंकु समारंभ मोठ्या उत्साहात कोरोना नियमावलीचे पालन करुन साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या संकट काळात रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेकरिताच सुरू असल्याने कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या सदस्या शर्वरीताई कांबळे व सुषमाताई ढाकणे ह्यांच्या सहकार्याने कर्जत रेल्वे स्थानकात हळदी कुंकु समारंभाचे आयोजन केल्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकातील महिला अधिकारी, कर्मचारी ह्यांच्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसुन आले. सदर प्रसंगी कर्जत रेल्वे जिआरपी, आरपीएफ विभागातील महिला कर्मचारी, महिला रेल्वे प्रवासी, तसेच आरपीएफचे आयपीएफ अनिल वर्मा, जिआरपीचे एपीआय संदिप बागुल, पीएसआय डुमरे, कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुरेशभाऊ खानविलकर, सचिव प्रभाकर गंगावणे, सदस्या शर्वरीताई कांबळे, सुषमाताई ढाकणे, स्नेहा ताई गोगटे, पत्रकार बाळु गुरव तसेच जिआरपी व आरपीएफचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close