ताज्या घडामोडी

कुपवाड मध्ये सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून.

बातमी आणि जाहिरात साठी संपर्क.
महेश पवार (मिरज प्रतिनिधी)9579951540
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड) 9834181802

कुपवाड मध्ये सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून.

कुपवाड मधील सराईत गुन्हेगार सन्या उर्फ शुभम पारसलाल जैन वय वर्ष 23 राहणार कुपवाड खारे मळा, या सराईत गुन्हेगाराचा त्याच्याच लहान सख्या भावाने पाठलाग करून दगडाने ठेचून निर्घृण खून केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सन्या उर्फ शुभम पारसलाल जैन याच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून तो अनेक ठिकाणी मारामाऱ्या खंडणी तसेच चोरी अशा अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. हा तरुण अनेक गुन्हेगारी कृत्यात सहभागी होता. याच माध्यमातून त्याच्या घरात देखील अरेरावी सुरू होती. शनिवारी रात्री देखील सन्या उर्फ शुभम याची त्याचा सख्खा लहान भाऊ शशांक पारसलाल जैन वय वर्षे 20 राहणार खारे मळा कुपवाड याच्याशी जोरात बाचाबाची होऊन घरगुती भांडण झाले व त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले असता त्याचा भाऊ सन्या उर्फ शुभम त्याच्या पाठीमागे कोयता घेऊन लागला व राणाप्रताप चौकांमध्ये त्याच्यावर वार केले.सन्या उर्फ शुभम खाली कोसळला व त्याच्या भावाने जमिनीवर पडलेला दगड त्याच्या डोक्यात घातला असता त्याचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती घटनास्थळावरून समोर येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे साहेब यांच्या टीम ने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व शशांक उर्फ चीट्या पारसलाल जैन याला काही वेळातच अटक करण्यात आली. गुण्यात वापरण्यात आलेले सशस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा पुढील तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे साहेब हे करत आहेत.

बातमी आणि जाहिरात साठी संपर्क.
महेश पवार (मिरज प्रतिनिधी)9579951540
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड) 9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close