ताज्या घडामोडी

रेशन कार्ड धारकांनी ई-पास मशिनवर नोंदनी करावी ,अन्यथा धान्य नाही : तहसीलदार हिले

येवला तहसिल पुरवठा विभाग नागरीकांची काळजी घेत आहेत ...नागरीकांनी वितरण प्रनालीत पारदर्शक्ता आनने साठी सहकार्य करावे

…अन्यथा धान्य नाही : तहसीलदार हिले

रेशनिंग प्रनालित पारदर्शक्ता आनन्यास  प्रशासन प्रयत्न शिल आहेत नागरीकांनी सहकार्य करावे   

प्रतेक रेशन कार्ड सदस्यांचे ई पास मशिन वर नोंदनी अवश्यक …अन्यथा रेशन मिळनार नाहीत …रेशनकार्ड मध्ये नाव राहनार नाही,…शिधा पञीका वर स्वस्त धाण्यदुकानातुन लाभ घेता येनार नाही  .रास्तभावातील वस्तु मिळनार नाही 

येवला : रेशन कार्ड मधील सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन करून घेणे सक्तीचे करण्यात आले असल्याने अन्नधान्य मिळण्यास पात्र अशा अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिका धारकांनीई-पॉस मशिनवर असलेल्या कुटुंबातील सदस्यापैकीज्या व्यतीचे आधार क्रमांक लिंक नाही त्यांनी तत्काळगावातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन ई-पॉस मशिनवर ३१ जानेवारीपावेतो आधार लिंक करावे, अन्यथा शिधापत्रिकेतून नावे वगळल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिधापत्रिका धारकाची असेल, असे आवाहन येवला तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे. रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली, तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांचे आधारसिडिंग, तसेचई-केवायसी पडताळणी मोहीम राज्यात राबविण्यात येत असून, येवला तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांनी आपल्या शिधापत्रिकेपैकी ऑनलाइन असलेल्या नावासमोर आधारलिंक केलेले नाही अशा सर्व शिधापत्रिकांमध्ये आधारव मोबाइल क्रमांक लिंक करण्याची कार्यवाही संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे ई-पॉस मशीनवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अन्नधान्यास पात्र सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपले आधार व मोबाइल क्रमांक ३१ जानेवारीपर्यंत लिंक करून घेण्यात यावे, असे आवाहन तहसीलदार हिले यांनी

केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close