ताज्या घडामोडी

होय… मी छगन भुजबळ बोलतोय…..

कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*

*

होय… मी छगन भुजबळ बोलतोय…..

सुषमा पैठणकर,येवला*.
*हा लेख सर्व प्रथम मा.भुजबळ साहेब* यांनी वाचला त्यांच्या परवानगीणे आपणासही वाचणेस देत आहोत. *जरूर जरूर वाचावे…*

!!🕘माझ्या मतदार संघाप्रती🕘!!*

*सुषमा पैठणकर,येवला*.
*हा लेख सर्व प्रथम मा.भुजबळ साहेब* यांनी वाचला त्यांच्या परवानगीणे आपणासही वाचणेस देत आहोत. *जरूर जरूर वाचावे…*

!होय… मी छगन भुजबळ बोलतोय…..!

*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा…!!*

2004 साली मी येवल्यात आलो,
दुष्काळी जनतेला बघुन कुठतरी मी ही हळवा झालो,
घेतला ध्यास करेन येवल्याचा विकास. समस्या होती पाण्याची, रस्ते, विजप्रश्न मात्र सोडविण्याची…
*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*

व्रत होते समाजसेवेचे,
येवल्याच्या भुमीत काही तरी पेरण्याचे,
स्वप्न होते मांजरपाड्याचे,
गुजरातकडे वाहून जाणारे पाणी नाशिककडे वळविण्याचे.
*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*

बोलता बोलता पंधरा वर्ष झाली.
संकटातही मात्र येवलेकरांनी साथ नाही सोडली,पक्ष नाही सोडला, आता तर मात्र भुमिपुत्राचा मुद्दाही येवलेकरांनी खोडला….
*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*

जातीपातीच राजकारण मी नाही केलं,शाहू फुले अंबेडकरांच्या विचारांना मी जपलं,
न्याय बंधु समतेचे धडे मी शिकलोय,
माझ्या ओ.बी.सी.बांधवांसाठी मात्र सदैव मी झटलोय….

*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*

*

वाटले होते कधी तरी संपलो मी,
हारलो मी ,खेळ नियतीचा येवल्याच्या मातीत पुन्हा जन्मला आलो मी, पुर्वपुण्याई थोर तळागाळातील जनतेचा मायबाप होवुन मात्र धन्य झालो मी….
*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*

अख्खा महाराष्ट्र माझी कर्मभुमी,

त्यात येवलेकर मात्र वेगळ्या स्थानी, नाही मी घाबरत तुरूंगवासाला, आरे येवलेकरांनो तुमचे आशीर्वाद घेवून मात्र उतरत राहिन मी न्यायदेवतेच्या परीक्षेला….
*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*

चारही दिशा पिंजून काढल्या,
देशात फिरलो, महाराष्ट्रात राहिलो, मुंबई गाठली, नाशिक खेटल,पण येवले करांसारख प्रेम मात्र कुठच नाही पाहिलं….
*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*

सगळी पदे मी उपभोगलो
मुंबई चा मी महापौर झालो,
नाशिक चा पालक मंत्री झालो,
महाराष्ट्राचा मंत्री ही झालो पण
येवल्याच्या आमदारकीत मात्र मी सुखावलो….
*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*

किती करता प्रेम माझ्यावर, आता मी भारावलोय, आयुष्य किती असेल माहित नाही,
पण शेवटचा श्वास सुध्दा तुम्हाला मी देईन,
एवढ मात्र खात्रीने सांगतोय….
*!!कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!*
*आपला नेता*
*मा.छगनरावजी भुजबळ*
🕘🕘🕘🕘🕘🕘🕘🕘

शब्दरचना – सुषमा पैठणकर, येवला. 9561572497

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close