ताज्या घडामोडी

*सेंट्रल रेल्वे मजदूर संघ नाशिक रोड* *यांच्या वतीने मास्क* *दिनदर्शिका वाटपाचे कार्यक्रम* **संपन्न*

 

*सेंट्रल रेल्वे मजदूर संघ नाशिक रोड* *यांच्या वतीने मास्क* *दिनदर्शिका वाटपाचे कार्यक्रम* **संपन्न* .*

भारती धिंगान (प्रतिनिधी)

नाशिक सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखा नाशिक रोड यांच्या विद्यमाने आज संघाचे सेक्रेटरी सुंदरम झा यांच्या टीमने मध्य रेल्वेचे सीनियर सेक्शन इंजिनीयर (रेल पथ) नाशिक रोड कार्यालया वर सदिच्छा भेट दिली. संघटन ही रेल्वे कामगारांची काळाची गरज आहे. आज हळूहळू रेल्वेचे खासगीकरण होत आहे. या खाजगीकरणाचा फटका देशातील प्रत्येक युवा पिढीला होण्याची दाट शक्यता आहे.तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना ह्या नोकरीपासून वंचित राहावे लागणार नाही याची दक्षता कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे. सेंट्रल रेल्वे मजदूर संघ 100% कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन रेल प्रशासना कडून त्यांचे हक्क मिळवून देणे कामी संघ सतत तत्पर आहे. असे संघाचे सेक्रेटरी सुंदरम झा यावेळी बोलत होते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन ट्रॅक मॅन कर्मचाऱ्यांना दिनदर्शिका, सभासद कार्ड, पेन, व मास्क याचे वितरण करण्यात आले. यावेळी लहू घुगे, दीपक ठोके, मुकुंद शिंदे, कैलास वाघ, खुशाल पेंटर, तुषार जाधव, नागू दादा, रफीक खांन, भिका पाटील, निलेश माकुणे, गौतम बागुल (बाबूजी) संजु कुमार, कैलास बोडके, सागर गांगुर्डे, मच्छिंद्र आव्हाड, सुनील देवरे, करूम चौरसिया, विलास घुगे, प्रवीण कटारे, धर्मेंद्र धिंगान इत्यादी ट्रॅक मेंटेनर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close