ताज्या घडामोडी

अचानक फरमान काढुन करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई विरुद्ध भाजीविक्रेतां चा नगरपालिकेत ठिय्या आंदोलन,

अचानक फरमान काढुन करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई विरुद्ध भाजीविक्रेतां चा नगरपालिकेत ठिय्या आंदोलन,

मनमाड: प्रतिनिधी अफरोज अत्तार,

मनमाड नगर पालिके तर्फे करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाई विरुद्ध
नगरसेवक गंगादादा त्रिभुवन व माजी नगराध्यक्ष कॉम्रेड रहमान शाह यांच्या नेतृत्वात भाजीविक्रेतांचा थेट नगरपालिकेत ठिय्या आंदोलन,

आंदोलनात घोषणांनी नगरपालिका परिसर दणाणून गेले होते,
अरे कोण म्हणतो देणार नाही,घेतल्या शिवाय राहणार नाही,अश्या घोषणा देत मुख्यधिकारी साहेब यांच्या कार्यालया बाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात आले

या वेळी,नगरसेवक गंगा दादा त्रिभुवन यांनी सांगितले की गेली 20 वर्षापासून मनमाड शहरातील भाजी,बोंबील, मासळी, सुकी मासळी या व्यापाऱ्यांची हेळसांड चालू असून न.प. त्यांच्या जिवाशी खेळत आहे. 20 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले डेली भाजी मार्केट नगराध्यक्ष यांनी भाजी विक्रेत्यांना लेखी आश्वासन देऊन सहा महिन्यात पूर्ण महिणारे भाजी मंडई गेलया 20 वर्ष झाली असता मार्केट ही चार कोटी रुपये खर्च करुन पुर्ण झालेली नसून ती आता कचरा कुंडी झाली आहे. संघटनेच्या वतीने मार्केटचे काम करण्यात यावे, यासाठी शेकडो आंदोलने, मोर्चे, धरणे आंदोलन असे अनेक आंदोलन झाली. परंतु या निर्लज्ज प्रशासनाला आता पर्यंत लाज वाटत नाही. त्या ठिकाणी संपूर्ण आठवडे बाजारात ओट्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. तसेच सदर जागी व्यापाऱ्यांना जागा पुरत नाही त्यामुळे 20 वर्षा पासून कुठलीही सुविधा नसतांना रस्त्यावर बसून आहे. व्यापान्यांना कुठलीही हौस नाही. त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यातच अनेक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही व्यापारी हे देशोधडीला लागले आहे. उन्हात, पावसात, थंडीत, व्यापारी हे रस्त्यावर बसले आहे. तसेच त्यात पोलीसांचा सासुरवास, व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो व दंड भरावा लागतो व पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना सहन करावे लागते. तसेच लॉकडाऊन मध्ये सुध्दा त्यांची हेळसांड झाली तरी व्यापान्यांची हक्काची तसेच त्यांच्या रोजी रोटी भरण्यासाठी जी जागा आहे. ती सावित्रीबाई फुले डेली भाजी कोट चे फक्त भाजी साठीच्या गाळ्यांचे काम त्वरीत सुरु करावे व भाजी व्यापाऱ्यांची हेळसांड तसेच त्यांची फजिती थांबवावी.

अन्यथा लवकरात लवकर मातोश्री सावित्रीबाई फुले डेली भाजी मार्केट व्यापारी संघटना आर.पी.आय.(आ) तर्फे उग्र व तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु करण्यात येईल याची गंभीर दखल घ्यावी हा निर्वाणीचा इशारा RPI(A) तर्फे देण्यात आला ,
मुख्यधिकारी साहेबां तर्फे सांगण्यात आले की,दोन दिवसात सावित्री फुले मार्केट साफसफाई करून सर्व भाजीविक्रेतां साठी जागा उपलब्ध करून देऊ,कोणीही भाजी दुकाने बाहेर लावू नये, या आश्वसान नंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले ह्या वेळी नगरसेवक गंगादादा त्रिभुवन माजी नगराध्यक्ष कॉम्रेड रहमान शाह यांच्या सह असंख्य भाजीविक्रेते उपस्तीत होते,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close