ताज्या घडामोडी

आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच तर्फे सांगली मधील १५ मान्यवर व्यक्तींना युवा गौरव पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात येणार

आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच तर्फे सांगली मधील १५ मान्यवर व्यक्तींना युवा गौरव पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात येणार

आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच सांगली शहराच्या विकासामध्ये हातभार लावलेल्या सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक व विविध क्षेत्रामधील स्वकर्तुत्वावर मोठे झालेल्या व नावारूपाला आलेल्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच तर्फे सांगली मधील १५ मान्यवर व्यक्तींना युवा गौरव पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. दीक्षित गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम हॉटेल ककून, शिवाजी स्टेडियम समोर, सांगली येथे गुरुवार दि. २१-०१-२०२१ रोजी सायं. ५ वा. होणार आहे.
या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्मृती मानधना, ए.बी.पी. माझा न्यूज रिपोर्टर कुलदीप माने, जैसन फौंड्रीचे मालक अमेय जाधव, राष्ट्रीय गोळाफेक खेळाडू नंदिनी पांढरे, बांधकाम व्यावसायिक सागर कुलकर्णी, युवा उद्योजक अमोल वाघमोडे, प्रगतीशील शेतकरी शीतल कनवाडे, प्रगतीशील शेतकरी बाहुबली पाचोरे, वीटभट्टी व्यावसायिक युवराज बोंद्रे, फोटोग्राफर शिवम यादव, खाद्य व्यावसायिक गणेश सूर्यवंशी, गायिका भक्ती साळुंखे, रेडीओलोजिस्ट डॉ. निखील मेहता, डी.एम. कार्डीओलॉजिस्ट डॉ. रोहित श्रीवास्तव, अॅड. रुपाली मेटकरी, चार्टेड अकौंटंट केदार साबणे यांचा युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close