कृषीताज्या घडामोडी

पालकमंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून कृती समिती चे भागवतराव सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश*

Breaking News:-

*देवनाचा सिंचन प्रकल्पासाठी 13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता.*

*पालकमंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून कृती समिती चे भागवतराव सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश*

*देवदरी ला साकारणार तालुक्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प.*

येवला दिनांक 19/01/2021

*येवला तालुक्यातील देवदरी येथील देवनाचा सिंचन प्रकल्पासाठी राज्य शासनाची 13 कोटी 77 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.नाशिक चे पालकमंत्री ना छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातुन मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रधान सचिव जलसंधारण यांनी हे आदेश दिलेत.*
*मुंबईत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत 12 कोटी 77 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली.*

*पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून देवनाचा सिंचन प्रकल्प कृती समिती कडून या प्रकल्पासाठी 2012 साला पासून नियोजन बध्द पाठपुरावा सूरु आहे.*

20 जानेवारी 2014 रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून जलविज्ञान संस्थेचे
या प्रकल्पासाठी ६५ दशलक्ष घनफुट (१८४० सहस्त्र घन मिटर) क्षमतेचे प्रमाण पत्र जलविज्ञान संस्था, नाशिक यांनी दिले आहे.
*कृती समितीचे अध्यक्ष भागवतराव सोनवणे यांनी* तापी खोर्‍यातील येवला तालुक्यातील १९५१ ते २०१३ या ६२ वर्षातील पर्जन्यमान, मन्याड अणि गिरणा उपखोर्‍यात बृहत आराखड्यातील पुर्ण झालेल्या प्रकल्पांचा पुर्ण झालेल्या वर्षांपासूनच ओव्हर फ्लो मिटर गेज तपशील, प्रस्तावित प्रकल्पांची क्षमता या आधारे युक्तीवाद करुन प्रमाण पत्र मिळवले होते.
2014 मध्ये झालेले सत्तांतर यामुळे हा प्रकल्प साठी ची गती मंदावली होती.मात्र भुजबळ मंत्री होताच पुन्हा या प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवनाचा कृती समिती व लाभार्थी शेतकर्‍यांनी अनेक आंदोलने केली होती.

*या प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी, देवदरी या गावामधील प्रत्यक्ष 358 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून भारम, कोळम खुर्द, कोळम बु. या शिवारातील भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्‍न सुटणार आहे.*

*कायमच अवर्षण ग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जल संजीवनी मिळणार आहे. येवला तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.*

*पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: या प्रकल्पासाठी लक्ष घातल्याने प्रकल्पाला चालना मिळाली आहे.*

*****************
*13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळणे हा या प्रकल्पातील मोठा टप्पा आहे. वन जमिन अधिग्रहण, प्रत्यक्ष उभारणी आदि कामे लवकरात लवकर मार्गी लागतील यासाठी पालकमंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरूच राहील*

– *भागवतराव सोनवणे*
*अध्यक्ष देवनाचा प्रकल्प कृती समिती.*
****************
*आमचे अनेक पिढ्यांचे स्वप्न साकार होणार असून आमचा दुष्काळ लवकरच संपेल अशी आशा निर्माण झाली आहे. ना. भुजबळ यांचे पाठीशी परिसरातील जनता खंबीरपणे उभी राहील – जगनराव मोरे – लाभार्थी शेतकरी.*
**********

*असा आहे देवनाचा सिंचन प्रकल्प :-*

एकुण खर्च मान्यता 12 कोटी 77 लाख
लाभार्थी गावे :- राहाडी खरवंडी , देवदरी
सिंचन क्षमता 358
उपलब्ध होणारे पाणी 65.33 दश लक्ष घनफुट
धरणाची लांबी 225 मीटर
धरणाची उंची 16.18 मीटर
सांडव्याची लांबी 90 मी
बुडीत क्षेत्र 57 हेक्टर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10220279783367184&id=1306448057

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close