ताज्या घडामोडी

नॅशनल रेल्वे मजदूर युनियन* *कर्षण मशीन कारखाना नासिक* *रोड शाखेच्यावतीने* *माजी सैनिकांचे सत्कार संपन्न

*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन* *कर्षण मशीन कारखाना नासिक* *रोड शाखेच्यावतीने* *माजी सैनिकांचे सत्कार संपन्न*

भारती धिंगान (प्रतिनिधी)

 नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कर्षण मशीन कारखाना नासिक रोड शाखेच्यावतीने माजी सैनिक आर्मी ची सेवा पूर्ण झाल्यानंतर आर्मी कोट्यातून रेल्वेत भरती होऊन टी. एम.डब्ल्यू.मध्ये काम करीत असलेल्या अशा जवानांचे 15 जानेवारी आर्मी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शॉल, फेटा, पुष्पगुच्छ, नारळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळेस 9 माजी सैनिक उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कॉम्रेड किरण खैरनार, मधुकर सांगळे, किशोर भामरे, मनोज नागरे, गजानन शेळके, मनीषा आहिरे, रियाज सय्यद, सुभाष सोनवणे, राजू वाघ तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. के. चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला संदीप कांगणे, एस. के. शेलार यांनी संबोधित केले. कॉम्रेड अनिल दराडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अंतिम क्षणात राष्ट्रगीत म्हणून संपन्न करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close