कृषी

वैशिष्ट्यपूर्ण भात जाती विकसित करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल -डॉ . संजय भावे

वैशिष्ट्यपूर्ण भात जाती विकसित करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल -डॉ . संजय भावे

कर्जत विजय डेरवणकर

भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी आता वेगवेगळया संशोधन पध्दती अवलंबून अधिक उत्पादन देणाऱ्या , कीड – रोग प्रतिकारक , समग्र पोषणमूल्ययुक्त जाती विकसित करण्यावर भर देणे गरजेचे असून परिणामकारकरीत्या परिवर्तनशीलता निर्माण करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल . असे प्रतिपादन डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ . संजय भावे यांनी केले .
प्रादेशिक षि संशोधन केंद्र , कर्जतच्या सहयाद्री सभागृहात 55 व्या महाराष्ट्र राज्य वार्षिक भात गट चर्चेला मागदर्शन करताना ते बोलत होते .
व्यासपीठावर डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.एम.एम.बुरोंडकर , कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एल नरंगळकर , वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.एम.एस.जोशी , सहयोगी संशोधन संचालक डॉ.एस.बी.भगत , भात विशेषज्ञ डॉ.आर.एल. कुणकेरकर उपस्थित होते .
डॉ.भावे पुढे म्हणाले की , “ भात व गरीबी ‘ ऐवजी ‘ भात व भरभराट ‘ असे समीकरण तयार होण्यासाटी भात प्रक्रिया उद्योग निर्मितीला चालना देणे आवश्यक आहे . अधिक उत्पन्न वाढीसाटी भातानंतर भात ऐवजी भात – कडधान्य , भात – तेलबिया आधारित कृषी पध्दती अवलंबविणे आवश्यक असून समग्र पोषणमूल्यासाठीही ती गरजेची आहे , असे त्यांनी नमूद केले . डॉ.बुरोंडकर म्हणाले की , दर्जा , उत्पादकता आणि प्रतिकारक्षमतेबरोबरच बदलत्या वातावरणनुरूप शाश्वत उत्पादन देणाऱ्या भात जातींच्या निर्मितीवर भर देण्याची गरज आहे . पारंपरिक पध्दतीने नवीन जात निर्माण करण्यास लागणारा 8 ते 10 वर्षांचा कालावधी कमी करण्यासाटी पारंपरिक पैदास पध्दतीबरोबरच गतिमान पैदास पध्दतीचा अवलब करणे आवश्यक आहे . रब्बी हंगामासाठी स्वतंत्र भात जात असावी तसेच खरीप हंगामासाठी उशिराने येणाऱ्या गरव्या व अधिक उत्पादन देणाऱ्या जाती निर्मितीवर भर द्यायला हवा , असे त्यांनी स्पष्ट केले . डॉ नरंगळकर यांनी कीड रोगाची तीव्रता कमीत कमी राखून अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्याची गरज प्रतिपादित केली . डॉ.जोशी म्हणाले की , वातावरणातील बदलानुरूप भातावरील रोगामध्ये बदल आढळून येत आहे . कोकणात यापूर्वी नगण्य समजल्या जाणाऱ्या ‘ पर्णकोष करपा ‘ , ‘ पर्णकोष कुजवा ‘ सारख्या रोगांची तीव्रता वाढू लागल्याने या रोगांना प्रतिकारक्षम जाती निर्माण करणे आवश्यक असून त्यादृष्टीने संशोधन कार्य हाती घेण्यात आले आहे . डॉ . भगत यांनी भाताचे महत्त्व स्पष्ट केल्यावर भविष्यातील भात शेतीमधील आहाने , धोके व संधी यांचा उहापोह करीत रोगप्रतिकारकक्षम जाती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले . डॉ.कुणकेरकर यांनी -कश्राव्य माध्यमातून सादरीकरणाद्वारे देश , राज्य व कोकण मधील भाताची सद्यस्थिती विशद करीत संशोधन कार्याचा आढावा घेतला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांनी स्व.बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन केले व दीप प्रज्वलन केल्यावर वार्षिक अहवालाचे प्रकाशनही केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवीन्द्र मर्दाने यांनी केले . आभार सहा.भात विशेषज्ञ डॉ.पी.बी. वनवे यांनी मानले . कार्यक्रमाला डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय सावंत व संशोधन संचालक डॉ.पराग हळदणकर हे ऑनलाईन तर कृषि संशोधन केंद्र , शिरगाव , रत्नागिरीचे प्रभारी अधिकारी डॉ.भरत वाघमोडे , जैव तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ.एस.व्ही . सावर्डेकर व वनशास्त्र महाविद्यालयाच्या कृषि वानिकेचे शास्त्रज्ञ डॉ.व्ही.व्ही . दळवी प्रामुख्याने उपस्थित होते .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close