ताज्या घडामोडीशैक्षणिक

येवला:अंगणवाडी शिक्षिकां साठी कठपुतली प्रशिक्षणाचे आयोजन

येवला:अंगणवाडी शिक्षिकां साठी कठपुतली प्रशिक्षणाचे आयोजन
संगीत नाटक अकादमी नवि दिल्ली व शिव उमा बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्था वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती येवला अंतर्गत जळगांव व मुखेड विभागातील अंगणवाडी शिक्षिकां साठी दिनांक ११/०१/२०२१ते१३/०१/२०२१या कालावधी साठी आयोजित एरंडगांव येथे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी
मा. श्री.भगवान गर्जे साहेब, यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व ज्योत प्रज्वलीत करून करण्यात आली.
सर्वांच्या स्वागतानंतर
प्रास्तविक पर्यवेक्षिकाश्रीमती ए.व्ही.आहिरराव यांनी केले.
छाया बाहुली नाट्य राष्ट्रीय कलाकार श्री अशोक जी मांजरे यांनी तिन दिवसांत घ्यावयाच्या प्रशिक्षणाची रूपरेषा स्पष्ट केली.
सी.सी.आर.टी.शिष्यवृत्ती धारक अरुंधती तांबे यांनी पपेट शो चे प्रात्यक्षिक सादर केले.
श्रीमती शितल कोळस यांनी कागदाच्या लगद्याचा मुखवटा करून दाखवला.
अनुकरणाने ४०अंगणवाडी शिक्षिकांनी प्रत्येकी एक मुखवटा तयार केला.यावेळी पपेटियर श्री योगेश मांजरे यांनी वैयक्तिक मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रकल्प अधिकारी श्री भगवान गर्जेसाहेबांनी आपल्या भाषणातून कठपुतलीच्या माध्यमातून आपल्या विभागासाठी कसे प्रबोधन करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका श्रीमती वंदना शिंपी यांनी केले.कु.सा‌क्षी आढाव यांनी सहकार्य केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close