ताज्या घडामोडी

भद्रकाली पोलीस स्टेशनची नायलॉन मांजाची सलग ०६ वी कारवाई*

*भद्रकाली पोलीस स्टेशनची नायलॉन मांजाची सलग ०६ वी कारवाई*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक दि. ११/०१/२०२१ रोजी सायंकाळी १९:३० वा. चे सुमारास खतीब डेअरीच्या बाजुला, दुधबाजार, भद्रकाली, नाशिक येथे एक इसम प्रतिबंधीत नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याची गुप्तबातमी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, साजन सोनवणे भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांना मिळाल्याने सायंकाळी १९:४० वा. चे सुमारास खतीब डेअरीच्या बाजुला , दुधबाजार, भद्रकाली, नाशिक या टिकाणी जावुन मिळालेल्या बातमीची खात्री करुन एक इसम हा नॉयलॉन मांजाची विकी करीत असल्याचे दिसून आल्याने लागलीच (तिवंधा लेन, मोरकर हाऊस समोर, भद्रकाली, नाशिक) याचेकडून ५३,०००/- रू. कि. चा हिरो प्लॅस, मोनो काईट, गोल्ड या नावाचे नॉयलॉन मांजाचे ४९ गटटु (नग ) सह ताब्यात घेतले असुन त्याबाबत त्याचे विरूध्द भद्रकाली पोलीस ठाणे गु. र. नं. १८/२०२१ भादवि कलम पर्यावरण ( संरक्षण कायदा ) १९८६ चे कलम ५, १५ सह भादविक १८८, २९०, २९१ प्रमाणे दि. ११/०१/२०२१ रोजी ०१:१२ वा. गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक जितेंद्र माळी हे करीत आहे.

यापूर्वी भद्रकाली पोलीस स्टेशन कडून नायलॉन मांजा विकी करणा-या इसमांविरुथ्द चार कारवाया करण्यात आलेल्या असुन एकुण १,२८,०००/- रूपये कि. चा नॉयलॉन मांजा हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री. दिपक पाण्डेय सा, ( पोलीस आयुक्त, नाशिक शहर), मा. श्री. अमोल तांबे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- १, मा. श्री. संग्रामसिंग निशानदार पोलीस उप आयुक्त, गुन्हे/विशा व मा. श्री. प्रदिप जाधव, सहा, पोलीस आयुक्त, विभाग-२, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. साजन सोनवणे, पोनि (गुन्हे) श्री. दत्ता पवार, पोलीस उप निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोउपनि /जितेंद्र माळी, पोलीस अंमलदार/ १९९७ इनामदार पोलीस अंमलदार/२७५ सैय्यद, पोलीस अंमलदार/ २६३ निंबाळकर, पोलीस अंमलदार/ ५२ गायकवाड, पोलीस अंमलदार/२२५७ पोटीदे, यांनी केलेली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close