ताज्या घडामोडी

एम एस जी एस इंग्लिश मीडियम स्कूल पालकांच्या संमतीने नियमांचे पालन करत सुरू

*एम एस जी एस इंग्लिश मीडियम स्कूल पालकांच्या संमतीने नियमांचे पालन करत सुरू.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल पालकांच्या संमतीने व विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादाने सुरू करण्यात आले.आज गुरुवार दि.७/१/२०२१ रोजी इ.९वी,१०वीचे वर्ग सुरू करण्यात आले.बाकीचे वर्ग शासन निर्णयानुसार सुरू करण्यात येणार आहे.शैक्षणिक वर्ष सन-२०२०-२१चे आज पहिला दिवस होता.जागतिक महामारी कोविड-१९ च्या प्रादूर्भावाने स्कुल मार्च २०२० पासून बंद होते.आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह बघायला मिळाला.पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची ८० टक्के उपस्थिती होती.दररोज विद्यार्थ्यांची ऑक्सिमिटर ने तपासणी करण्यात येणार आहे. सॅनिटायजर व मास्क लावल्या नंतर स्कुल मध्ये प्रवेश मिळणार आहे.वर्ग रोजच्या रोज सॅनिटाइज केले जाणार आहे.वर्ग सुरू करण्या अगोदर विद्यार्थ्यांच्या स्वागताचा छोटासा कार्यक्रम झाला.यात विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व मास्क वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रामनाथ काका एंडाईत,पालक नारायण आहेर तर अध्यक्ष प्रिन्सिपल अल्ताफ खान होते.कार्यक्रमाची सुरुवात सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.यावेळी सागर घोडके,अजहर खतीब यांनी विद्यार्थ्यांना स्कुल मध्ये घ्यावयाची काळजी याबाबद्दल विविध सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.अध्यक्षीय भाषणांत अल्ताफ खान यांनी अभ्यास आणि आरोग्याची काळजी घेण्याची सूचना केली.
याप्रसंगी गणेश सोनवणे,दीपक खैरनार,प्रशांत बिवाल,वैभव पवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल आहेर यांनी तर आभार प्रदर्शन सागर घोडके यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close