ताज्या घडामोडी

नायलाॅन माजां वर बंदी आणावी मनविसे सह नागरिकांनी केली मागणी. निफाङ तालुका विशेष

नायलाॅन माजां वर बंदी आणावी मनविसे सह नागरिकांनी केली मागणी. निफाङ तालुका विशेष

प्रतिनिधी प्रमोद सासवडे

निफाङ-:नायलॉन मांजा हा किती घातक आहे याचे उदाहरण पुन्हा दिसून आले माणसासोबतच पक्षांना सुद्धा या मांज्यामुळे धोका निर्माण होत असून पिंपळगाव शहरात एका व्यक्तीचे नायलॉन मांजामुळे नाक कापून गंभीर दुखापत झाली तर झाडावर अडकलेल्या मांजामुळे घुबड पक्षाच्या पंखाला दुखापत झाल्याची घटना घडल्यामुळे स्थानिक प्रशासनाने हा नायलॉन मांजा विक्री करण्याऱ्या दुकान व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
१४ जानेवारी रोजी मकर संक्रांत हा सण येत असल्याने आता आकाशात पंतग उडण्यास सुरुवात झाली आहे मात्र ही पतंग उडविताना पतंग प्रेमी नायलॉन मांजाचा अधिक वापर करत असल्याने या मांजामुळे नागरिकांना, पक्षांना, प्राण्याना किती मोठा धोका आहे याचा विसर पडत चालला आहे. नायलॉन मांजा किती घातक आहे हे पिंपळगाव शहरातील २ घटनांवरून दिसून येते महादेव अंबादास कहाणे रा. पालखेड मिरचीचे हे पालखेड कडून पिंपळगाव कडे येत असताना निफाड रोड परिसरात त्यांचे नॉयलॉन मांज्यामुळे नाक कापून गंभीर जखमी झाले त्यानंतर एका झाडावर नायलॉन मांजा अडकल्यामुळे घुबड पक्षाच्या पंखाला दुखापत झाल्याची घटना घडली आहे.
नायलॉन मांजा हा घातकी असूनही याची सर्रास विक्री होत आहे. या मांजामुळे कित्येक नागरिकांचे गळे कापून जीव गमवावा लागला असून पक्षांचे सुद्धा मृत्यू या मांजामुळे झाले आहे. हा नायलॉन मांजा विक्री करण्याऱ्या दुकान व्यावसायिकाची चौकशी करून स्थानिक प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री करण्याऱ्या वर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकानी केली आहे.

……………………………

नायलॉन प्रकारचा मांजा हा शहरामध्ये विक्री होत आहे. या मांजामुळे व्यक्तीसह, प्राणी व पक्षांना सुद्धा धोकादायक असून हा मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी

गिरीश कसबे
मनविसे, तालुका अध्यक्ष.

…………………………
नायलॉन मांजा हा घातक असून या मांजामुळे जीव गमवावा लागत असल्याने पोलीस प्रशासन हा नायलॉन मांजा विक्री व खरेदी करण्याऱ्या नागरिकांनावर तात्काळ कारवाई करणार आहे.

भाऊसाहेब पटारे
पोलीस निरीक्षक, पिंपळगाव.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close