ताज्या घडामोडी

४६४ जागांसाठी १००९ उमेदवार निवडणुक रिंगणात

पोलीस टाइम्स येवला तालुका प्रतिनिधी महेश दारुंटे.

४६४ जागांसाठी १००९ उमेदवार निवडणुक रिंगणात
येवला : तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असून, यात आठ ग्रामपंचायतीसह एकूण १,८१९ सदस्य प्रतिस्पर्धीअभावी बिनविरोध निवडून आले आहेत.
६९ ग्रामपंचायतींच्या २३३ प्रभागाच्या ६५३ जागांसाठी एकूण १,७८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत यापैकी १५ अर्ज अवैध ठरले. तर उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीत ५७३ उमेदवारांनी माघार घेतली. पारगाव, अडसुरेगाव, कुसमाडी, पिंपळगाव जलाल, कानाडी ,पिंपरी,कातरणी व सावरगाव या ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता ४६४ जागांसाठी १,००९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तालुक्यातील महालखेडा, पाटोदा, येथे ११ पैकी १० सदस्य बिनविरोध झाले असून केवळ एका जागेसाठी निवडणूक होत आहे. याबरोबरच खामगाव येहे ७ पैकी ५,नांदूर ७ पैकी १, देवळाणे येथे ९ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या असून प्रत्येकि दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. पन्हाळसाठे येथे ९ पैकी ६ , गणेशपूर येथे ७ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्याने ३ जागांसाठी तर कोळगाव येथे ४ जागांसाठी निवडणूक होत आहे.
बिनविरोध सदस्य पुढीलप्रमाणे : रेंडाळे, – प्रभाग क्र. १ फिरदोस मुलतानी,प्रभाग क्र .२ कमलबाई मोरे, खरवंडी – प्रभाग क्र .२ वैशाली दाणे शोभा दाणे,जगन्नाथ मोरे, जळगाव नेऊर प्रभाग क्र. २ रंजनाबाई शिंदे, विमल घुले, प्रभाग क्र. ३ आत्माराम शिंदे, सुनीता शिंदे, देवठाण – प्रभाग क्र. १ मनीषा सोनावणे, प्रभाग क्र. २ चित्रा वक्ते, अंनकुटे प्रभाग क्र. २ प्रवीण बर्डे, ललिता लेकुरवाळे, पन्हालसाठे – प्रभाग क्र. १ अशोक मुंढे, अलका पालवे, स्वाती मुंढे, प्रभाग क्र.२ धनराज पालवे, पुंजाबाई नाईकवाडे, राजन घुगे, खिर्डीसाठे – प्रभाग क्र. २ वर्ष नागरे, प्रभाग क्र.३ संतष मोरे, सुरेश शिंदे, सोन्याबाई नागरे, गुजरखेडे – प्रभाग क्र. ३ सोमनाथ जाधव, मीराबाई चव्हाण, सरूबाई चव्हाण, खैरगव्हाण – प्रभाग क्र. १ सोपं ठाकरे, मंगला लोखंडे, भाग्यश्री सैद, ठाणगाव – प्रभाग क्र. ३ पुष्पाबाई शेळके, बाभुळगाव खुर्द – प्रभाग क्र. २ सुनीता गायकवाड, अहिरे, रेखा बनसोडे, प्रभाग क्र. ४ कविता सोनावणे, रामा गायकवाड, नांदूर – प्रभाग क्रमांक ३ सुनीता पगारे, अंदरसूल प्रभाग क्र. अश्विनी खैरनार, सीमा जाधव, विखरणी प्रभाग क्र. ३ राधा पवार, धामोडे- प्रभाग क्र . ३ आनंदा भड प्रभाग क्र. ३ चंद्रकला लाड, मुरमी – प्रभाग क्र. १ महेश शिंदे, प्रभाग क्र. २ अरुणा पानसरे, पाटोदा – प्रभाग क्र. ५ मंगलाबाई बोरनारे, सविता बोराडे, राहुल वऱ्हे, धामणगाव – प्रभाग क्र.२ मीना गवळी, रामकिसन ठाकरे, चंद्रकला ठाकरे, प्रभाग क्र. ज्ञानेश्वर वाळुंज, तळवाडे – प्रभाग क्र.१ संतोष आराखडे, प्रभाग क्र. ३ मोतीराम पवार, सुमन जाधव सरला गायकवाड, कोळगाव – प्रभाग क्र. १ किशोर आहेर, शोभा आगवन. शिलाबाई चव्हाण, प्रभाग क्र. २ शशिकांत धनवटे, प्रभाग क्र. ३ रामदास मोरे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close