ताज्या घडामोडी

आम्ही तुमच्या विचारांचा सन्मान करतो ह्या मेसेज मधील विचार तुम्हाला पटले नाही तर तुम्ही या मेसेज कडे दुर्लक्ष

*हा ब्रॉडकास्ट मेसेज आहे*
*आम्ही तुमच्या विचारांचा सन्मान करतो ह्या मेसेज मधील विचार तुम्हाला पटले नाही तर तुम्ही या मेसेज कडे दुर्लक्ष करा.*

नमस्कार मित्रांनो
महा डिजिटल मिडिया असोसिएशन MDMA. ही महाराष्ट्रातील पहिली स्व नियामक संस्था आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांना वेगवेगळ्या संघटना त्यांचे सभासदत्व देत असतात हे सभासदत्व देत असताना पत्रकारांकडून दोनशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत वेगवेगळी रक्कम उकळली जाते. महत्त्वाच्या पदासाठी तर दहा दहा हजार रुपये पर्यंत ही रक्कम घेतल्याच्या चर्चा समाज माध्यमातून होत असतात.कुणी त्यांच्या सभासदत्वासाठी किती रक्कम घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मात्र महाराष्ट्रातील पत्रकारांची आर्थिक स्थिती पाहता त्यांच्याकडून अशा प्रकारची रक्कम उकळणे पूर्णपणे गैर आहे बेजबाबदारपणा आहे.मुळात संघटना स्थापन करण्यासाठी हजार रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च होत नाहीत मग हजार रुपयात संघटना स्थापन करायची आणि त्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे लाख रुपये कमवायचे असा धंदाच काही लोकांनी चालू केलेला आहे. हे सर्व कुठे तरी थांबायला हवं.मित्रांनो संघटनेचे सभासदत्व घेतल्यानंतर म्हणजेच पैसे भरल्याची पावती मिळाल्यानंतर प्रत्येक सभासदाला संघटनेची घटना मागण्याचा अधिकार आहे तसेच एखाद्याने आजीवन सभासदत्वाचे पैसे भरले असतील आणि त्याची पावती त्याच्याकडे असेल तर संघटनेची कार्यकारिणी संघटनेच्या कडे असलेला मालमत्तेचा तपशील तसेच निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेण्याचा अधिकार या सभासदाला प्राप्त होतो.साऱ्या दुनियेला नियम आणि कायदे शिकवणारे पत्रकार मात्र संघटनेच्या लोकांना हे नियम आणि कायदे कधी शिकवत नाहीत आणि ना कधी विचारतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे.मित्रांनो शंभर दोनशे रुपये घेऊन आपणच आपल्या बांधवांची फसवणूक करतो हे तथाकथित संघटना चालवणाऱ्यांना का समजत नाही यापेक्षा अशी रक्कम जमा करून एखादं चांगलं कार्य होऊ शकते एखाद्या पत्रकारांना काहीतरी गरज असलेली मदत त्याच्या माध्यमातून मिळू शकते याचे भान तथाकथित संघटना चालवणाऱ्यांना असायला हवे. मी एका संघटनेचा जबाबदार पदाधिकारी म्हणून तसेच माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून आपणास आश्वस्त करतो की आम्ही सभासदत्वाचा नावाखाली कोणत्याही प्रकारचे पैसे आधीच अडचणीत असलेल्या पत्रकारांना मागणार नाही. त्यापेक्षा एखादी सेवा उपलब्ध असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याच पत्रकार बांधवांना उपलब्ध करून देण्यात आम्हाला आनंद होईल. मित्रांनो सभासदत्वाचा च्या नावाखाली पैसे उकलण्याचा जो गोरखधंदा महाराष्ट्रात चालू आहे तो प्रत्येक पत्रकारांनी बंद करायलाच हवा.ज्यांनी ज्यांनी अशा संघटनांची पैसे भरले अशा सर्व लोकांना मी आवाहन करतो की तुम्ही या सर्व पैशाचा हिशोब तुमच्या संघटना च्या लोकांना नक्की मागावा.

*हा संदेश आपल्याला आवडला असल्यास आपल्या स्वतःच्या नावाने फॉरवर्ड करायला माझी काही हरकत नाही*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close