आपला जिल्हा

माधव नगर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

सांगली जिल्हा प्रतिनिधी
विजय तिकोटी

हेडिंग-माधव नगर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

माधवनगर मध्ये अंगणवाडी क्रमांक 109, 111, 112, 118, मध्ये सर्व अंगणवाडी सेविका महिला शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. तसेच थोर समाजसेविका होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार व समाजसुधारणेच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी स्त्रियांना सुशिक्षित सुसंस्कृत बनवले समाजातील विषमता दूर करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. गोरगरीब अस्पृश्य समाजाकरता बहुमूल्य कार्य केले. अशा या अखंड कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती माधवनगर मध्ये उत्साहात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच सौ निर्मला जीतू पवार या होत्या. तर अंगणवाडी सेविका उषा खाडे, विजया बनसोडे, मंगल सौदी, वंदना काळे व सर्व मदतनीस नागरिक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना माजी उपसरपंच सौ निर्मला जीतू पवार यांच्या हस्ते खाऊवाटप करण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close