ताज्या घडामोडी

मनमाड शहर कॉंग्रेस ब्लॉक कमिटी तर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

*मनमाड शहर कॉंग्रेस ब्लॉक कमिटी तर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

पोलीस टाईम्स प्रतिनिधी. आफरोज अत्तार

मनमाड:- दि. 03 जानेवारी 2021 रोजी मनमाड शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने व महिला शहराध्यक्षा मुमताज आपा बेग यांच्या पुढाकाराने थोर समाजसेविका व स्त्री शिक्षणासाठी आपले संपुर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक नाजीमभाई शेख हे होते. यावेळी मनमाड शहर काँग्रेस ब्लॉक कमिटी च्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष नाजीमभाई शेख यांच्या हस्ते सावित्रीच्या लेकींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळेस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व उपस्थित मान्यवरांचे अभिवादनपर भाषणे झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणात नगरसेवक नाजीमभाई शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीबद्दल बोलतांना आधुनिक युग आणि स्त्री शिक्षणाबद्दलची परिस्थिती विशद केली.राजकारण,समाजकारण, शिक्षण,क्रीडा, इत्यादी क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. याचे उदाहरण देत नुकत्याच अमेरिकेत पायलट या पदावर नियुक्त झालेल्या मुंबईतील अफशा कुरेशी या तरुणीची प्रशंसा केली. हे फक्त शिक्षणामुळे,सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच शक्य झाले. प्रत्येक महिलेने आपल्या आयुष्यात योग्य शिक्षण आत्मसात करावे हीच खरी सावित्रीबाईंना आदरांजली असेल अशा शब्दात नाजीमभाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर ऍड. फरीदा यांनी महिलांना अधिक बळकट होण्यासाठी संगठीत होणे गरजेचे आहे यासाठी सुशिक्षित महिलांनी पुढे येऊन समाजातील अशिक्षित महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. महिला शहराध्यक्षा मुमताज आपा बेग यांनी महिलांनी सावित्रीबाईंचे गुण आत्मसात करावे व महिलांना अधिक बळकट करण्यासाठी शासनाच्या स्व रोजगाराच्या विविध योजना असून त्याचा फायदा घ्यावा व समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी जेणेकरून सावित्रीबाईंच्या परिश्रमाला यश मिळेल, असे मत व्यक्त केले.तसेच ऍड. वाल्मिक जगताप यांनी प्रत्येक स्त्री ने सावित्रीबाईंनी केलेल्या त्यागाची जाण ठेवावी व येणाऱ्या प्रत्येक पिढीला सावित्रीबाईंच्या योगदानाची माहिती द्यावी, सावित्रीबाईंच्या नावाने स्पर्धा परीक्षेचे, वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करावे असे मत व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमास काँग्रेस चे ज्येष्ठ नेते अशोक व्यवहारे, नगरसेवक नाजीमभाई शेख,बाळासाहेब साळुंके, इलियासभाई पठाण, सईद दादा, ऍड. फरीदा मिठाईवाला, महिला शहराध्यक्षा मुमताज आपा बेग,ऍड. वाल्मिक जगताप, अफरोज शेख व इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते, घकार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक व्यवहारे यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close