ताज्या घडामोडी

नावंढेमध्ये अखंड हरिनाम जपयज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न, गावात नवचैतन्य

नावंढेमध्ये अखंड हरिनाम जपयज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न, गावात नवचैतन्य

खालापुर – समाधान दिसले

भक्तकामकल्पद्रुम भगवान पंढरीनाथाच्या कृपेने व साधुसंताच्या आशिर्वादाने तसेच गुरुवर्य ह.भ.प.तानाजी महाराज कर्णुक यांच्या कृपाशिर्वादाने आणि ग्रामस्थ, परिसरातील भाविक भक्तांच्या सहकार्याने अखंड हरिनाम  जपयज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 31 डिसेंबर ते 3 जानेवारी खालापूर तालुक्यातील नावंढे गावामधील भैरवनाथ मंदिरात संपन्न झाल्याने यामध्ये काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरि किर्तन, जागर भजन यांच्यासह श्रीची महापुजा, कळशपुजन, विनापुजन, मृदुंगपुजन, ग्रंथपुजन, टाळपुजन, दिपोत्सव, श्रीची पालखी सोहळा. काल्याचे किर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम चार दिवशीय सप्ताहामध्ये पार पडल्याने गावात नवचैतन्य पसरले होते, तर या अखंड हरिनाम सोहळ्यामुळे गावात एकीचे रुप प्राप्त झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

     नावंढे, बीडखुर्द पंचक्रोशीला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभल्याने या परिसरातून अनेक वारकरी संप्रदायाची मंडळी भगवतांच्या नामस्मरणातून समाज प्रबोधनाचे धडे विविध धार्मिक कार्यक्रमातून समाजाला देत आहे. याच अनुषंगाने नावंढे गावातील तरुण पिढी व ग्रामस्थांमधील मतभेद बाजूला सारुन गावकरी एकत्र येण्याच्या उद्देशाने श्री भैरवनाथ देवाची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अखंड हरिनाम जपयज्ञ सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजन ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येत असल्याने वर्षीचा 4 दिवशीय हरिनाम सप्ताह सोहळा 31 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान संपन्न झाल्याने यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 9 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, 4 वाजून 30 मिनिट ते 5 वाजून 30 मिनिट प्रवचन, सायंकाळी 5 वाजून 30 मिनिट ते 6 वाजून 30 मिनिट हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरि किर्तन तद्नंतर जागर भजन अशी दैनंदिन कार्यक्रम तर महापूजा, कळशपुजन, विनापुजन, मृदुंगपुजन, ग्रंथपुजन, टाळपुजन, दिपोत्सव, काल्याचे किर्तन असे विविध धार्मिक व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम पार पडल्याने गावात नवचैतन्य पसरले होते.

        तसेच प्रवचनकार ह.भ.प.गोपिनाथ महाराज पाटील, ह.भ.प.कल्पना महाराज विषे व किर्तनकार ह.भ.प.अनिल महाराज तुपे, रायगड भूषण ह.भ.प.रामदास (भाई) महाराज पाटील, ह.भ.प.सौ.वनिताताई पाटील तसेच काल्याचे किर्तन रायगड भूषण ह.भ.प.तानाजी महाराज कर्णुक धाकटी पंढरी अशा नामवंत मंडळींनी आपल्या प्रवचन, किर्तनरुपी सेवेतून समाजप्रबोधनाचे धडे देत गावकऱ्यांनी आयोजन केलेल्या सप्ताहाचे तोंड भरून कौतुक करीत गावकऱ्यांमध्ये अशीच एकी निर्माण राहावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close