ताज्या घडामोडी

माहीती अधिकारातुन नांदुर ग्रामपंचायतीच्या कामांचा अहवाल व प्रशासकिय मान्यता मागणीसाठी निवेदन

शिवकुमार आनंद विशेष प्रतिनिधी येवला पोलिस टाईम्स

माहीती अधिकारातुन नांदुर ग्रामपंचायतीच्या कामांचा अहवाल व प्रशासकिय मान्यता मागणीसाठी निवेदन

भारतीय जनता पार्टी (ग्रा) येवला तालुका चे सरचिटणीस श्री संतोष काटे यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी अर्ज
नांदुर ग्रामपंचायतीच्या मागील कामांची माहीती व प्रशासकीय मान्यता तसेच कार्यारंभ आदेशाची माहीती मिळावी ह्या साठी दि.१९/११/२०२० रोजी केलेल्या अर्जात श्री संतोष काटे यांनी माहीती आधिकारात मा . गटविकास अधिकारी यांना अर्ज केला. अर्जात ग्रामपंचायत नांदुर चा मुद्रांक शुल्क, १३ वा वित्त आयोग, १४ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार निधी व खर्च, जनसुविधा अंतर्गत आलेला निधी, आरोग्य विभागामार्फत राबविलेल्या सेवांचा आढावा, गावातील घरपट्टी २०१६ ते २०२० पर्यंतची माहीती अशा मागणी साठी विनंती अर्ज केला होता.
नांदुर ग्रामपंचायत मार्फत किती कामे केली व प्रत्यक्षात कीती आहे. ह्या बाबत माहीती मागतांना श्री काटे यांनी १) जि. प. निधी २) पंचायत समिती निधी ३) आमदार निधी ४)खासदार निधी ५) मुख्यमंत्री निधी ६) सा. बांधकाम निधी ७) पंतप्रधान विकास निधी ह्या सर्व निधींचा खर्च व कार्यारंभ आदेशाची मागणी केली आहे.
१५ दिवस उलटुन गेले तरी हया अर्जाचे उत्तर न मिळाल्याने वरिष्ठ अधिकारी यांना अपिल करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे श्री संतोष काटे यांनी सांगितले.
सोबत गटविकास अधिकारी यांना केलेल्या अर्जाची छायांकीत प्रत जोडली आहे.
त्यांच्या अशा प्रकारच्या मागणीतुन जनसामान्याची सेवाच होईल अशी त्यांना तळमळ वाटते. प्रशासकीय अधिकारी यांनी ह्या अपिलाचा लवकरात लवकर माहीती आधिकार शासन निर्णयानुसार सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी करणेत आलेली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close