ताज्या घडामोडी

भारतीय कामगार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अॅड. मिश्रा यांची निवड

भारतीय कामगार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अॅड. मिश्रा यांची निवड

मुंबई : भारतीय कामगार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अॅड. सतिश मिश्रा यांची निवड झाली आहे. ही नियुक्ती संघटनेच्या मेळाव्यामध्ये जाहीर करून कमिटी निवडण्यात येणार होती मात्र कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. नुकताच शिवडी येथील मध्यवर्ती कार्यालय मध्ये भारतीय कामगार संघटनेचा मेळावा आयोजिला. यावेळी भारतीय कामगार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सतिश मिश्रा यांची निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी साजिद खान यांची एक मताने निवड करण्यात आली यावेळी संघटनेच्या सदस्यपदी अब्बास घडियाली, शहीद रिजवी, विजय चव्हाण, इरफान हाकम, इरफान शेख, यांची निवड करण्यात आली. लवकरच संघटनेची कार्यकारणी घोषित केली जाणार असल्याचे साजिद खान यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close