ताज्या घडामोडी

बनकर पाटील शैक्षणीक संकुलाच्या यशात असाही एक मानाचा तुरा…

बनकर पाटील शैक्षणीक संकुलाच्या यशात असाही एक मानाचा तुरा…
येवला तालुका
प्रतिनिधी 9890984042 ;- विलास कांबळे
 येवला 
         श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ हि संस्था बनकर पाटील शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या उपक्रम व कार्यक्रमामुळे तालुक्यात अल्पावधीतच नावारूपाला आले आहे. त्याचे श्रेय अर्थातच अध्यक्ष व येवला नगरपालिकेचे नगरसेवक प्रवीण बनकर यांना जाते.त्यांच्या याच योगदानाबद्दल त्यांना यंदाचा संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीतर्फे देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवनगौरव पुरस्कार २०२० चा उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था गौरव पुरस्कार देण्यात आला.यासह जिल्हातील इतर विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस या वेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  संस्थेने तालुक्यात नसेल अशी सी.बी.एस.ई माध्यमाची शाळा सुरु करून येवला तालुक्याच्या शैक्षणिक पटलावर आपले नाव कोरले.तर मागील शैक्षणिक वर्षात सुरु झालेल्या फार्मसी कॉलेजचा पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकालामुळे जिल्हात नाव झाले.यासर्व कामगिरीच्या जोरावर जिल्हात मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर यांनी स्वीकारून संस्थेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.यावेळी प्रवीण बनकर यांनी हा पुरस्कार संस्थेला जरी मिळाला असला तरी तो मुळात संस्थेत काम करणाऱ्या प्राचार्यापासून ते मदत करणाऱ्या मावशीमुळे मिळाला आहे.तसेच सर्व पालकांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळे मिळाला आहे असे सांगत हा पुरस्कार त्या सर्व शिक्षक,कर्मचारी व पालकांना समर्पित आहे असे गौरोद्गगार काढले.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक  सहकार नेते अंबादास बनकर, सेक्रेटरी माधव बनकर, संचालक मंडळ पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य पंकज निकम आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश कोकणे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचार्यांनी प्रवीण बनकर यांचे व संस्थेच्या पदाधिकार्याचे अभिनंदन करत पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुरस्कार वितरण  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कापड व्यापारी सोमनाथ हाबडे होते. विशेष निमंत्रित म्हणून साहित्यिक व  शिवव्याख्याते नंदन रहाणे, तर उद्घाटन गुरुद्वारा प्रबंधन कमिटी येवल्याचे प्रधान बलरामसिंगजी संधू यांनी केले. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक मुकेश लचके, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भोलानाथ लोणारी, व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके, कुणाल दराडे,  राजेंद्र गणोरे, किशोर सोनवणे, सुहास भांबारे, जयवंत खांबेकर, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close