ताज्या घडामोडी

दिव्यांगाना स्वतंत्र शिधापत्रिका देणेबाबत. महाराष्ट्र शासन

दिव्यांगाना स्वतंत्र शिधापत्रिका देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्र: बैठक -२०२०/प्र.क्र.१९/नापु २८

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक: २१ डिसेंबर, २०२०

१) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन निर्णय,क्रमांक : साविव्य- १०९९/प्र.क्र.८८८६/नापु-२८,दिनांक ५.११.१९९९.

२) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन निर्णय,क्रमांक : साविव्य- १००१/प्र.क्र.४८३/नापु-२८,दिनांक ८.०८.२००१

३) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक : साविव्य- १००५/प्र.क्र.१८०३/नापु-२८,दिनांक २५.०५.२००५

४) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र.शिवाप- २०१३/प्र.क्र.१०५/नापु-२८, दिनांक २९ जून,२०१३

५) अन्न नागरी पुरवठा च ग्राहक संरक्षण विभाग, शासन निर्णय क्र.असुका- २०१३/प्र.क्र.३१९/नापु-२२, 2. दिनांक १७ डिसेंबर,२०१३

प्रस्तावना :

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ नुसार ७६.३२ टक्के ग्रामीण (४६९.७१ लक्ष) व ४५.३४ टक्के शहरी (२३०.४५ लक्ष) अशी एकूण ७००.१६ लक्ष लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. या अधिनियम अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची- अंत्योदय गट व प्राधान्य गट अशा दोन प्रमुख गटात विभागणीं करण्यात आली आहे.सदर अधिनियमाअंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये त्यावेळी लाभ घेत असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थ्यांना व बीपीएल गटातील सर्व लाभार्थ्यांना प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून पात्र ठरविण्यात आले आहे. सदर अधिनियमाची अंमलबजावणी दिनांक १ फेब्रुवारी, २०१४ पासून राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे.

२. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ नुसार शिघापत्रिकेवर अनुज्ञेय असलेला अन्नधान्याचा लाभ, जे दिव्यांग व्यक्ती कुटुंबासोबत एकत्र राहतात व त्यांची नावे त्याच शिधापत्रिकेत नमूद असून देखील पात्र दिव्यांग व्यक्ती अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहत असल्याची बाब शासनाच्या निर्दशनास आली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

राज्यामध्ये लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शासनाने संदर्भाधिन क्र. १,२ व ३ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या निकषांतर्गत पात्र कुटुंबाना अनुज्ञेय शिधापत्रिका देण्यात येते. तसेच नवीन शिधापत्रिका देताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शक सूचना वर नमूद केलेल्या क्र. ४ येथील दिनांक २९.०६.२०१३ च्या परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत.

२. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ नुसार अन्नघान्याचा लाभ मिळण्यासाठी ज्या दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका हवी आहे, अशा दिव्यांग व्यक्तींनी नवीन शिधापत्रिकेसाठी संबधित शिधावाटप कार्यालयाकडे अर्ज करावा. दिव्यांगाकडून स्वतंत्र शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या निकषांतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना नवीन अनुज्ञेय शिधापत्रिका व त्यानुषंगाने शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असणारे लाभ तात्काळ देण्यात यावे.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२०१२२८१७०५४८८४०६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षंकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Mahesh

Hanamant Kanade:

D ety Meenan DN s M a tnt And Conue hdon nt

(महेश कानडे)

कार्यासन अधिकारी

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

प्रत,

१) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

२) मुख्य सचिव यांचे कार्यालय

३) सर्व विभागीय

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close