ताज्या घडामोडी

कॉलेज तरुणांच्या शिवसैनिक दलाच्या वतीने खोपोलीतील प्राचीन श्री कृष्ण मंदिराची साफसफाई,

तरुणांच्या कामगिरीचे कौतुक

कॉलेज तरुणांच्या शिवसैनिक दलाच्या वतीने खोपोलीतील प्राचीन श्री कृष्ण मंदिराची साफसफाई,

तरुणांच्या कामगिरीचे कौतुक

खालापूर – समाधान दिसले

खोपोली शहरातील जनता विदयालय ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विशाल केदार या तरुणांच्या संकल्पनेतुन शिवसैनिक दलाची स्थापना करीत वर्षभर या दलाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सुरू असून नुकतीचे या दलातील सदस्यांनी खोपोली शहरातील प्राचीन श्री कृष्ण मंदिराची साफसफाई करण्यात आल्याने या तरुणांच्या स्त्युत्य कामगिरीतून मंदीराची साफसफाई झाल्याने अनेकांनी तरुणांच्या कामगिरीचे कौतुक करीत या सर्वाना भावी उज्वल वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

कॉलेज तरुणांच्या शिवसैनिक दलाच्या वतीने वर्षभर अनेक कार्यक्रम पार संपन्न होत असून यामध्ये वृक्षारोपण, गडकिल्ले मोहिम, सार्वजनिक ठिकाणची साफसफाई, छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा असे एक ना अनेक कार्यक्रम पार पडित असल्याने नुकतेच शिवसैनिक दलातील पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने खोपोली शहरातील प्राचीन श्री कृष्ण मंदिराची साफसफाई करण्यात आल्याने या तरुणांच्या स्त्युत्य कामगिरीतून मंदीराची साफसफाई झाल्याने अनेकांनी तरुणांच्या कामगिरीचे कौतुक केले.

याप्रसंगी शिवसैनिक दल संस्थापक विशाल केदार, दल प्रमुख कुणाल पाटिल, अक्षय जाणकर, कुणाल काकडे, सुयश दिसले, किरण पवार आदि शिवसैनिक दलाची प्रमुख उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close